शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
5
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
6
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
7
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
8
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
9
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
10
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
11
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
12
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
13
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
14
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
15
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
16
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
17
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
18
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
19
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
20
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
Daily Top 2Weekly Top 5

...त्या रात्री झोप उडाली होती : मनदीप

By admin | Updated: June 21, 2016 19:16 IST

दडपणामुळे मला त्या रात्री झोपच लागली नाही आणि मैदानात पाय ठेवल्यानंतर सर्वकाही सुरळीत झाले

ऑनलाइन लोकमत

हरारे, दि. 21 - दडपणामुळे मला त्या रात्री झोपच लागली नाही आणि मैदानात पाय ठेवल्यानंतर सर्वकाही सुरळीत झाले, अशी प्रतिक्रिया दुसऱ्या टी-२० लढतीत नाबाद अर्धशतकी खेळीत भारताला झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत बरोबरी साधून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा युवा फलंदाज मनदीप सिंगने व्यक्त केली. सोमवारच्या लढतीत १०० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मनदीपने नाबाद ५२ धावांची खेळी केली. फलंदाजीसाठी मैदानात पाय ठेवल्यानंतर दडपण कमी झाले, असे त्याने सांगितले. सामन्यानंतर बोलताना मनदीप म्हणाला, सामन्याच्या पूर्वीच्या रात्री मला झोप आली नाही. मालिका जिंकण्याचे विचार मनात घोळत होते. त्याचप्रमाणे निवड समितीचे आपल्यावर लक्ष आहे, हे तथ्यही नाकारता येत नाही. याला तुम्ही दडपण म्हणून शकता किंवा निराशा म्हणता येईल, पण फलंदाजीला गेल्यानंतर सर्व काही सुरळीत होते. किमान माझ्याबाबतीत हे लागू होते. त्यावेळी लक्ष्य केवळ १०० धावांचे असून ते कसे गाठता येईल, याचाच विचार होता. मैदानावर उतरल्यानंतर निवड समिती सदस्य मला बघत आहेत, याचा विचार मी करीत नाही. मालिका महत्त्वाची असल्यामुळे सामन्यापूर्वी अशा बाबी मनात घोळत असतात, पण मैदानात दाखल झाल्यानंतर सर्वकाही सुरळीत होते.मनदीप पुढे म्हणाला, पहिल्या टी-२० मध्ये धक्कादायक पराभव स्वीकारावा लागल्यानंतर निकालापेक्षा केवळ कामगिरीवर लक्ष केंद्रित केले होते. त्यामुळे मालिकेत बरोबरी साधता आली. निकालावर अधिक विचार करण्यापेक्षा कामगिरीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असते. मालिका विजय मिळवण्यास उत्सुक असतो, पण नेहमी त्याचाच विचार केला तर दडपण येते.