अफगाणपुढे न्यूझीलंडचे आव्हान
By Admin | Updated: March 8, 2015 01:38 IST2015-03-08T01:38:08+5:302015-03-08T01:38:08+5:30
आॅस्ट्रेलियाकडून दारुण पराभव पत्करणाऱ्या अफगाणिस्तानला उद्या शानदार फॉर्ममध्ये असलेल्या न्यूझीलंडकडून कडवे आव्हान मिळणार आहे.

अफगाणपुढे न्यूझीलंडचे आव्हान
नेपियर : आॅस्ट्रेलियाकडून दारुण पराभव पत्करणाऱ्या अफगाणिस्तानला उद्या शानदार फॉर्ममध्ये असलेल्या न्यूझीलंडकडून कडवे आव्हान मिळणार आहे.
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊदी याने तर अफगाणिस्ताविरुद्ध विजयी घोडदौड सुरू ठेवण्यासाठीच खेळू, असा निर्धार केला आहे.
पत्रकारांशी बोलताना साऊदी म्हणाला, ‘‘या स्पर्धेत कमकुवत संघांनी अनेकदा उत्कृष्ट कामगिरी केल्याची उदाहरणे आहेत. अफगाणिस्तानला विजयाची संधी मिळू नये, याची खबरदारी घेतली जाईल.’’
न्यूझीलंडने आधीच क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला असून, अफगाणिस्ताननंतर १३ मार्च रोजी त्यांना हॅमिल्टन येथे बांगला देशविरुद्ध्न खेळायचे आहे.
अफगाण संघ आॅस्ट्रेलियाकडून २७५ धावांनी पराभूत झाला असेल; पण सहा वर्षांचा अनुभव असलेल्या या संघाला अद्याप विजयाची आशा आहे. स्कॉटलंडवर या संघाने पहिला विजय साजरा केला, तसेच लंकेला धूळ चारण्यासाठी त्यांनी कंबर कसली होती. पण माहेलाने शतकी खेळी करीत अफगाणिस्तानच्या आशेवर पाणी फेरले.
न्यूझीलंड-अफगाणिस्तान संघ वन डेत कधीही परस्परांविरुद्ध खेळलेले नाहीत. न्यूझीलंडचे कोच असलेले माईक हेसन यांनी २०११-१२ मध्ये केनियात प्रशिक्षणादरम्यान अफगाणच्या वेगवान गोलंदाजांना जवळून न्याहाळण्याची संधी मिळाली होती. शापूर जादरान, दौलत जादरान, हमीद हसन हे तिघेही प्रतिताशी १४० कि.मी. वेगवान मारा करू शकतात; शिवाय चेंडू स्विंग करण्याची कला त्यांना अवगत असल्याचे हेसन म्हणाले. गेल्या सामन्यात आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सनचा चेंडू आदळल्याने जखमी झालेला कर्णधार ब्रेंडन मॅक्युलम उद्या सामना खेळण्यासाठी फिट असल्याचे कोचने सांगितले.
(वृत्तसंस्था)
न्युझीलंड : बेंडन मॅक्युलम (कर्णधार), कोरी अॅण्डरसन, ट्रेंट बाउल्ट, ग्रांट एलिओट, मार्टिन गुप्टील, टॉम लॅथम, मिशेल मॅकक्लेनघन, नॅथन मॅक्युलम, कायल मिल्स, अॅडम मिल्ने, लुक रोंची (यष्टीरक्षक), टिम साऊथी, रॉस टेलर, डॅनिएल व्हिटोरी, केन विलियमन्सन.
अफगाणिस्तान : मोहम्मद नाबी (कर्णधार), अफसार जाजाई (यष्टीरक्षक), आफ्ताब आलम, असघर स्तानिक्झाई, दवलत जद्रान, गुलबादीन नैब, हामिद हसन, जावेद अहमदी, मिरवैस अर्शफ, नाजीबुल्लाह जद्रान, नासीर जमाल, नवरोज मंगल, सॅमिउल्लाह शेनवारी, शपूर जद्रान, उसमान घानी, हशमातुल्लाह शाइदी, इजातुल्लाह दवलतजाई, शाफिकउल्लाह, शराफुद्दीन अशराफ