नेटीझन्सनी 'युवराज'वर उधळली स्तुतीसुमने

By Admin | Updated: January 20, 2017 08:29 IST2017-01-20T08:17:12+5:302017-01-20T08:29:22+5:30

कॅन्सरवर यशस्वीरित्या मात करून फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा भरारी घेणारा युवराज सिंगने कटक वनडे १५० शानदार खेळी करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा बजावला.

Netizens praised the 'Yuvraj' | नेटीझन्सनी 'युवराज'वर उधळली स्तुतीसुमने

नेटीझन्सनी 'युवराज'वर उधळली स्तुतीसुमने

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २० - कॅन्सरवर यशस्वीरित्या मात करून फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा भरारी घेणारा युवराज (१५०) आणि मिस्टर कूल म्हणून प्रसिद्ध असलेला मात्र तितकीच दमदार फलंदाजी करणारा महेंद्रसिग धोनी (१३४) या दोघांच्या २५६ धावांच्या शानदार भागीदारी केली. त्यांच्या या सर्वोत्तम खेळीमुळे इंग्लंडविरुद्धच्या अटीतटीच्या सामन्यात भारताने १५ धावांनी विजय मिळवला आणि ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. युवराज सिंगच्या या जिगरबाज खेळीमुळे फक्त त्याचे सहकारीच नव्हे तर चाहतेही खूप खुश झाले असून सोशल मीडिया साईट्सवर 'युवी'च्या कौतुकाला उधाण आले आहे. ट्विटर, फेसबूकवर 'युवराज' ट्रेंडिंगमध्ये असून चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत तसेच माजी सहका-यांनीही युवीचे भरभरून कौतुक केले आहे. युवराजचा आणि सर्वांचा लाडका खेलाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन, बादशाह शाहरूख खान, इम्रान हाश्मी यांच्यासह अनेकांनी युवीचे कौतुक करत त्याचे अभिनंदनही केले. 

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

 

 

Web Title: Netizens praised the 'Yuvraj'