शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

National Sports Day : आज दोघांना मिळणार 'खेल रत्न'; या खेळाडूंचाही होणार राष्ट्रीय पुरस्काराने गौरव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 12:39 PM

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आज विविध क्रीडापटूंना पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

नवी दिल्ली : आशियाई व राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि पॅरा अॅथलिट दीपा मलिक यांना यंदाचा राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे आणि राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त त्यांना आज या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. त्यांच्यासह क्रिकेटपटू रवींद्र जडेजा आणि पूनम यादव यांना अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. 

बजरंगला 2015 मध्ये अर्जुन पुरस्कार आणि 2019मध्ये पद्म श्री पुरस्काराने सन्मानित केले होते. कुस्ती महासंघाने या पुरस्कारासाठी विनेश फोगाटच्या नावाची शिफारस केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या त्बिलिसी ग्रां प्रि स्पर्धेत त्यानं इराणच्या पेइमन बिब्यानीला ( 65 किलो ) पराभूत करून सुवर्णपदक जिंकले होते. तत्पूर्वी त्यानं जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक जिंकून जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानही पटकावले होते. बजरंगच्या नावावर राष्ट्रकुल स्पर्धेतील दोन पदकं आहेत. त्यानं 2014च्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते, तर गतवर्षी सुवर्णपदक पटकावले.  

पॅरा गोळाफेक व भालाफेकपटू दीपा मलिकने 2016च्या पॅरालिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. शिवाय आशियाई पॅरा स्पर्धेत दीपाच्या नावावर तीन कांस्य व एक रौप्यपदक आहे.

पुरस्कार विजेते

  • राजीव गांधी खेल रत्न - बजरंग पुनिया ( कुस्ती) व दीपा मलिक ( पॅरा अॅथलिट)
  • द्रोणाचार्य पुरस्कार - विमल कुमार ( बॅडमिंटन), संदीप गुप्ता ( टेबल टेनिस), मोहिंदर सिंग ढिल्लोन ( अॅथलिट)
  • जीवनगौरव पुरस्कार - मेर्झबान पटेल ( हॉकी), रंबीर सिंग खोक्कर ( कबड्डी), संजय भरद्वाज ( क्रिकेट)
  • अर्जुन पुरस्कार - तजिंदरपाल सिंग तूर ( अॅथलिट), मोहम्मद अनास याहीया ( अॅथलिट), एस भास्करन ( बॉडीबिल्डींग), सोनिया लाथेर ( बॉक्सिंग), रवींद्र जडेजा ( क्रिकेट), चिंग्लेनसाना सिंग कंगुजान ( हॉकी), अजय ठाकूर ( कबड्डी), गौरव सिंग गिल ( मोटर स्पोर्ट्स), प्रमोद भगत ( पॅरा स्पोर्ट्स बॅडमिंटन), अंजुम मुदगील ( शूटींग), हरमित राजुल देसाई ( टेबल टेनिस), पूजा धांडा ( कुस्ती), फॉदा मिर्झा ( इक्वेस्टेरियन), गुरप्रीत सिंग संधू ( फुटबॉल), पूनम यादव ( क्रिकेट), स्वप्ना बर्मन ( अॅथलिट), सुंदर सिंग गुर्जर ( पॅरा अॅथलिट), बी साई प्रणित ( बॅडमिंटन), सिमरन सिंग शेरगिल ( पोलो)
  • ध्यानचंद पुरस्कार - मॅन्युएल फ्रेडीक्स ( हॉकी), अरुप बसाक ( टेबल टेनिस), मनोज कुमार ( कुस्ती), नितीन किर्तने ( टेनिस), सी. लाल्रेमसंगा ( तिरंदाजी) 
टॅग्स :National Sports Dayराष्ट्रीय क्रीडा दिवसWrestlingकुस्तीravindra jadejaरवींद्र जडेजा