शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय खो-खो स्पर्धा महाराष्ट्र मुलींचा संघ अजिंक्य

By admin | Updated: October 12, 2014 21:48 IST

नाशिक : महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी उपांत्य फेरीच्या सामन्यात दणदणीत विजय मिळवून अंतिम फेरीमध्ये दिमाखदार प्रवेश केला आहे. अंतिम सामन्यात दोन्ही संघाचा पारंपारिक प्रतिस्पर्धी कर्नाटकबरोबर सामना होणार आहे. राज्याच्या मुलांच्या संघाने सलग ९ वेळा राष्ट्रीय स्तरावर विजेतेपद मिळविले आहे. तर मुलींच्या संघाला कर्नाटक संघाकडून गतवर्षी १ गुणांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्याची परतफेड त्यांनी कर्नाटकचा १०-७ गुण मिळवून ३ गुणांनी पराभव करत केली.

नाशिक : महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी उपांत्य फेरीच्या सामन्यात दणदणीत विजय मिळवून अंतिम फेरीमध्ये दिमाखदार प्रवेश केला आहे. अंतिम सामन्यात दोन्ही संघाचा पारंपारिक प्रतिस्पर्धी कर्नाटकबरोबर सामना होणार आहे. राज्याच्या मुलांच्या संघाने सलग ९ वेळा राष्ट्रीय स्तरावर विजेतेपद मिळविले आहे. तर मुलींच्या संघाला कर्नाटक संघाकडून गतवर्षी १ गुणांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्याची परतफेड त्यांनी कर्नाटकचा १०-७ गुण मिळवून ३ गुणांनी पराभव करत केली. अजमेर, राजस्थान येथे राष्ट्रीय स्तरावरील कुमार गटाच्या खो-खो स्पर्धा सुरु असून, रात्री उशिरा अंतिम सामने होणार आहेत. तत्पूर्वी सकाळी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मुलांच्या संघाने पश्चिम बंगाल विरुद्ध १६-११ गुण मिळवून १ डाव ५ गुणांनी विजय मिळविला. या सामन्यात स्वप्नील चिकणे १ मि. २० से. व १.१० संरक्षण करून ५ गडी बाद केले. अनिकेत पोटेने १ मि. ४० से. संरक्षण तर ३ गडी बाद केले. तानाजी सावंत, संदेश महाडिक यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. तर सागर घागने २ मिनिट आणि १ मि. ४० सेकंद संरक्षण करून संघाच्या विजयाला हातभार लावला.मुलींच्या संघाने ओरिसावर १२-७ गुण मिळवून १ डाव ५ गुणांनी विजय मिळवित मुलीही काही कमी नाही हे दाखवून दिले. या सामन्यात श्वेता गवळी ३ मि. १० से. संरक्षण करीत २ गडी बाद केले. प्रियंका भोपी हीने २ मि. २० से. संरक्षण आणि १ गडी बाद केला. ऐश्वर्या सावंत हिने ३ मिनिट आणि १ मि. ३० से. असे भक्कम संरक्षण करून २ गडी बाद केले. कविता घाणेकरने ३ गडी तर शितल भोर हिने २ गडी बाद करून संघाच्या विजयात वाटा उचलला. (क्रीडा प्रतिनिधी)