शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
5
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
6
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
7
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
8
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
9
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
10
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
11
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
12
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
13
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
14
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
15
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
16
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
17
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
18
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
19
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
Daily Top 2Weekly Top 5

नदाल भारताविरुद्ध खेळणार

By admin | Updated: September 7, 2016 03:38 IST

भारताला आगामी डेव्हिस चषक विश्व प्ले आॅफ टेनिस सामन्यात १४ ग्रॅण्डस्लॅमचा मानकरी असलेला राफेल नदाल याच्या आव्हानाचा सामना करावा लागेल.

नवी दिल्ली : भारताला आगामी डेव्हिस चषक विश्व प्ले आॅफ टेनिस सामन्यात १४ ग्रॅण्डस्लॅमचा मानकरी असलेला राफेल नदाल याच्या आव्हानाचा सामना करावा लागेल. या लढतीसाठी स्पेनने नदालचा समावेश असलेला बलाढ्य संघ जाहीर केला.अमेरिकन ओपनच्या चौथ्या फेरीत पराभूत झालेला जागतिक क्रमवारीतील पाचव्या स्थानावरील खेळाडू नदालशिवाय १३ व्या स्थानावरील डेव्हिड फेरर, १८ व्या स्थानावरील फेलिसियानो लोपेझ आणि १९ व्या स्थानावर असलेला दुहेरीतील खेळाडू मार्क लोपेझ यांनाच स्पेन संघात समावेश आहे. भारतीय संघात साकेत मायनेनी(एटीपी रँकिंग १४३), रामकुमार रामनाथन (२०२), रोहन बोपन्ना (१७) आणि लिएंडर पेस (६२) यांचा समावेश आहे. स्पेन संघाबाबात प्रतिक्रिया देताना न्यूयॉर्कहून बोलताना साकेत म्हणाला, ‘ हा स्पेनचा सर्वांत बलाढ्य संघ आहे. आमच्यासाठी अवघड आव्हान असेल. सामन्यात आम्ही सर्वोत्कृष्ट कामगिरी करू, अशी आशा आहे. स्पेन संघ टेनिस प्रकारात युरोपमध्ये सर्वांत भक्कम मानला जातो. भारतीय संघ विश्व ग्रुपमध्ये स्थान मिळविण्यासाठी सतत प्रयत्न करीत आहे. आशिया- ओसियाना क्षेत्रातून प्ले आॅफ गाठण्यासाठी भविष्यातही भारताला एकेरीत उत्कृष्ट खेळाडूंचा शोध घ्यावा लागेल.भारत आशिया- ओसियाना गटात कोरियावर ४-१ ने विजयासह प्ले आॅफमध्ये दाखल झाला. स्पेनने युरोप- आफ्रिका गटात रोमानियाला नमवून प्ले आॅफमध्ये धडक दिली. (वृत्तसंस्था)