शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

नदाल, शारापोव्हा उपांत्यपूर्व फेरीत

By admin | Updated: January 26, 2015 02:57 IST

दुखापतीतून सावरत जबरदस्त कमबॅक करणाऱ्या स्पेनच्या राफेल नदाल आणि महिला गटात दुसरी मानांकित रुसची मारिया शारापोव्हा

मेलबर्न : दुखापतीतून सावरत जबरदस्त कमबॅक करणाऱ्या स्पेनच्या राफेल नदाल आणि महिला गटात दुसरी मानांकित रुसची मारिया शारापोव्हा यांनी आॅस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. कारकिर्दीतील १५वे ग्रॅण्डस्लॅम पटकाविण्यासाठी उत्सुक असलेल्या नदालने दक्षिण आफ्रिकेच्या केवीन अँडरसनचा सरळ सेटमध्ये ७-५, ६-१, ६-४ असा पराभव केला, तर शारापोव्हाने चीनच्या पेंग शुआईचा ६-३, ६-० असा फडशा पाडला.रोड लेवर एरेना येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात नदालने साडेसहा फूट उंच अ‍ॅँडरसनला दोन तासांंपूर्वीच पराभूत केले. नदालने ३३ विनर्स लगावले आणि ८९ गुणांची कमाई केली. नदालने सहापैकी चार ब्रेक पॉर्इंट कमावले, तर अँडरसनला सहापैकी एकातही ब्रेक पॉर्इंट मिळविता आला नाही. नदालला उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सातव्या मानांकित झेक प्रजासत्ताकच्या थॉमस बर्डीचशी मुकाबला करावा लागेल. बर्डीचने आॅस्ट्रेलियाच्या टॉमिकचा ६-२, ७-६, ६-२ असा पराभव केला.महिला एकेरीत किताबाची प्रबळ दावेदार शारापोव्हाने अवघ्या ७५ मिनिटांत शुआईचे आव्हान परतविले. शारापोव्हाने पहिल्या सेटमध्ये दोन वेळा चिनी खेळाडूची सर्व्हिस ब्रेक केली. मात्र, सात गेमच्या मॅरेथॉन सामन्यात शुआईने संघर्ष करीत चार ब्रेक पॉर्इंट कमाविले. शारापोव्हाने एकूण २७ विनर्स लगावले. शारापोव्हाचा पुढचा मुकाबला कॅनडाच्या युजिनी बुकार्डशी होणार आहे. बुकार्डने रोमानियाच्या इरिना कॅमेलिया बेगूवर ६-१, ५-७, ६-२ असा विजय साजरा केला. याआधी झालेल्या लढतीत रुसच्या एकातेरिना माकारोवाने जर्मनीच्या ज्युलिआ ज्योर्जिसला ६-३, ६-२ असे पराभूत केले. पुढच्या फेरीत तिला रोमानियाच्या सिमोना हालेपशी मुकाबला करावा लागेल. हालेपने बेल्जियमच्या यानिना विकमेयरचा ६-४, ६-२ असा पराभव केला.