शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
2
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
3
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
4
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
6
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
7
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
8
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
9
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
10
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
11
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
12
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
13
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
14
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
15
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
16
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
18
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
19
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
20
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी

मुंबईकर महिलांची विजयी सलामी

By admin | Published: June 28, 2016 11:52 PM

अपुर्वा आचरेकर, दिव्या हेगडे आणि एश्वर्या नारायणमुर्ती या मुंबईच्या त्रयीने चमकदार विजय मिळवताना पहिल्या महाराष्ट्र राज्य निवड चाचणी स्पर्धेच्या महिला गटात विजयी सलामी

महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन : पुरुषांमध्ये उत्कर्ष, मिशील व अखिलेश यांची चमक

मुंबई : अपुर्वा आचरेकर, दिव्या हेगडे आणि एश्वर्या नारायणमुर्ती या मुंबईच्या त्रयीने चमकदार विजय मिळवताना पहिल्या महाराष्ट्र राज्य निवड चाचणी स्पर्धेच्या महिला गटात विजयी सलामी दिली. त्याचवेळी पुरुष गटात उत्कर्ष शिलवंत (ठाणे), मिशील शाह (मुंबई) आणि अखिलेश जोशी (पुणे) यांनी आगेकूच केली. महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेच्या मान्यतेने स्पोर्ट्स युनायटेडच्या वतीने चेंबुर जिमखानाला सुरु असलेल्या या स्पर्धेत अपुर्वाने ग्रेटर मुंबईच्या अरुंधती सब्बनचे आव्हान १५-५, १५-६ असे सहजपणे संपुष्टात आणले. दिव्या हेगडेनेही दमदार बाजी मारताना ठाण्याच्या सय्यद उकाशाचा १५-८, १५-३ असा धुव्वा उडवला. तर एश्वर्याने नागपूरच्या प्रियांका पिल्लेचे आव्हान १५-३, १५-१० असे परतावले. त्याचवेळी तीन गेमपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात पुण्याच्या युगंधरा डखोळेने झुंजार खेळ करताना ठाण्याच्या संज्योत पाताडेला १५-८, १३-१५, १५-९ असे नमवले.त्याचवेळी, पुरुषांमध्ये मुंबईकर मिशीलने दणदणीत विजय मिळवताना नागपूरच्या सौरभ आपटेला १५-५, १५-१० असे पराभूत केले. तर, पुण्याच्या अखिलेशने एकहाती वर्चस्व राखताना मुंबईच्या राहूल सिंगचा १५-५, १५-८ असा फडशा पाडला. ठाण्याच्या उत्कर्षनेही आक्रमक खेळाच्या जोरावर अमरावतीच्या शांतनू देशमुखला १५-५, १५-४ असे लोळवले. (क्रीडा प्रतिनिधी)