मुंबईची हाराकिरी, पंजाबचा रोमहर्षक विजय

By Admin | Updated: May 13, 2016 23:28 IST2016-05-13T23:22:19+5:302016-05-13T23:28:26+5:30

मुंबईने पंजाबला दिलेले १२५ धावांचे सोपे आव्हान सहा आणि कर्णधार विजयच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर १७ व्या षटकात १२७ धावा करत सहज पार केले

Mumbai's Heraldry, Punjab's Thrilling Victory | मुंबईची हाराकिरी, पंजाबचा रोमहर्षक विजय

मुंबईची हाराकिरी, पंजाबचा रोमहर्षक विजय

>ऑनलाइन लोकमत
विशाखापट्टणम, दि. १३ - मुंबईने पंजाबला दिलेले १२५ धावांचे सोपे आव्हान सहा आणि कर्णधार विजयनं अर्धशतकी खेळीच्या जोरावर १७ व्या षटकात १२७ धावा करत सहज पार केले. कर्णधार विजयने संयमी ५२ धावा केल्यात. तर सहाने झटपट ४० चेंडूत ५६ धावांची आक्रमक खेळी करत संघाला ७ गडी राखून विजय मिळवून दिला. हशीम आमला लवकर बाद झाल्यानंतर विजय आणि सहाने दुसऱ्या विकेटसाठी ११६ धावांची भागीदारी करत संघाला विजयाच्या समीप आणले. मॅक्सवेल भोपळाही न फोटता तंबूत परतला. गुरकित सिंगने नाबाद ६ धावा केल्या. मुंबईकडून मॅक्लेघनने २ तर साऊदीने १ बळी मिळवला. त्यापूर्वी मुंबई संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ९ गड्यांच्या मोबदल्यात १२४ धावा केल्या होत्या. 

Web Title: Mumbai's Heraldry, Punjab's Thrilling Victory