शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
3
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
4
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
5
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
6
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
7
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
8
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
9
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
10
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
11
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
12
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
13
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
14
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
15
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
16
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
17
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
19
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
20
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

हाँग काँगमध्ये मुंबईकर वीरची भरारी

By admin | Updated: August 4, 2014 02:51 IST

येथे पार पडलेल्या हाँग काँग ज्युनिअर ओपन स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा अव्वल खेळाडू वीर चोत्रानी आणि यश फडते यांनी १३ वर्षांखालील गटात अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदकाची कमाई केली.

हाँग काँग : येथे पार पडलेल्या हाँग काँग ज्युनिअर ओपन स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा अव्वल खेळाडू वीर चोत्रानी आणि यश फडते यांनी १३ वर्षांखालील गटात अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदकाची कमाई केली. अव्वल मानांकित मुंबईच्या वीरने गोव्याच्या यशवर १४-१२, ८-११, ११-७, ११-८ असा विजय साजरा केला. पहिल्या सेटमध्ये चुरशीची लढत देऊनही पराभव पत्करावा लागलेल्या यशने दुसऱ्या सेटमध्ये कमबॅक करीत सामना १-१ असा बरोबरीत आणला. त्यानंतर वीरने दमदार खेळ करून पुढील दोन्ही सेट जिंकून सुवर्णपदकावर नाव कोरले. यशने नुकत्याच पार पडलेल्या एनएससीआय ओपन आणि जर्मनीत झालेल्या पायोनिअर चषक स्पर्धेत बाजी मारली होती. त्यामुळे त्याच्याकडून कडव्या झुंजीची अपेक्षा वर्तविण्यात येत होती. यशने झुंज दिली खरी, परंतु त्याला या वेळी यश मिळाले नाही. याआधी वीरने इराणमध्ये पार पडलेल्या २१व्या आशियाई ज्युनिअर वैयक्तिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीत यशला उपविजेतेपदावर समाधान मानण्यास भाग पाडले होते. या दोन भारतीयांव्यतिरिक्त तुषार शहानी याने हाँग काँगमध्ये तिरंगा फडकवला. त्याने १५ वर्षांखालील गटात यजमान वाँग किंग येउंग अ‍ॅथनीचा ११-१, १५-१३, ११-८ असा सरळ सेटमध्ये पराभव करत सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेत कॅनडा, चायनीस तायपैइ, इजिप्त, इंग्लंड, भारत, जपान, कोरीआ, मकाऊ चायना, मलेशिया, सिंगापूर आदी १४ देशांतील ५३० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. (वृत्तसंस्था)