दिल्लीला हरवून मुंबई उपांत्य फेरीत

By Admin | Updated: January 14, 2017 01:14 IST2017-01-14T01:14:37+5:302017-01-14T01:14:37+5:30

प्रो कुस्ती लीगच्या दुसऱ्या सत्रात आज येथे झालेल्या लढतींमध्ये मुंबई महारथी संघाने दिल्ली सुल्तान्सला ४-३ असे हरवून उपांत्य

In the Mumbai semi-final, defeating Delhi | दिल्लीला हरवून मुंबई उपांत्य फेरीत

दिल्लीला हरवून मुंबई उपांत्य फेरीत

नवी दिल्ली : प्रो कुस्ती लीगच्या दुसऱ्या सत्रात आज येथे झालेल्या लढतींमध्ये मुंबई महारथी संघाने दिल्ली सुल्तान्सला ४-३ असे हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
साक्षीने नाणेफेक जिंकून पुरुष गटातील ५७ किलोगटाला ब्लॉक केले त्यामुळे मुंबईच्या राहुल आवारे याला मैदानात उतरता आले नाही.
दिल्लीच्या डेव्हीड तलाशादजे आणि मुंबईचा युवा मल्ल प्रीतम यांच्यातील लढत डेव्हीडने जिंकून दिल्लीला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दिल्लीच्या मारिया स्टाडनिक हिने ४८ किलो गटात मुंबईच्या कॅरोलिना कास्टिलो हिडाल्गो हिला हरवले. ७४ किलो वजन गटात रिओ कांस्यपदक विजेता जबरायिल हसानोव्हने दिल्लीच्या प्रवीण राणाला हरवून मुंबईला पहिला गुण मिळवून दिला. दिल्लीची कर्णधार साक्षी मलिकने ५८ किलो गटात मुंबईच्या सरिताला हरवले. मुंबईच्या विकासने ६५ किलो गटात दिल्लीच्या सुरजीत ग्रेवाल याला चारी मुंड्या चित केले. मुंबईची कर्णधार एरिका विबे हिने ७५ किलो गटात एलिना माखिनियाला हरवून बरोबरी साधली. आणली. निर्णायक लढतीत पावलो ओलिनिकने सत्यव्रत कादियानवर विजय मिळवून मुंबईला उपांत्य फेरीत पोहचवले.

Web Title: In the Mumbai semi-final, defeating Delhi