शहरं
Join us  
Trending Stories
1
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
2
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
3
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
4
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
5
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
6
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
7
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
8
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
9
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
10
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
11
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
12
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
13
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
14
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
15
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
16
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
17
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
18
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
19
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
Daily Top 2Weekly Top 5

मुुंंबई - पुणे सायकल शर्यत रंगणार

By admin | Updated: March 26, 2016 02:20 IST

देशभरात नावाजलेल्या आणि खडतर मानल्या जाणाऱ्या ५१व्या मुंबई-पुणे राष्ट्रीय अजिंक्यपद सायकल शर्यतीचा थरार २७ मार्चला रंगणार आहे. सायकलिंग फेडरेशन आॅफ इंडियाच्या मान्यतेने

मुंबई : देशभरात नावाजलेल्या आणि खडतर मानल्या जाणाऱ्या ५१व्या मुंबई-पुणे राष्ट्रीय अजिंक्यपद सायकल शर्यतीचा थरार २७ मार्चला रंगणार आहे. सायकलिंग फेडरेशन आॅफ इंडियाच्या मान्यतेने होत असलेल्या या शर्यतीला मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी, काळा घोडा येथून हिरवा झेंडा दाखवण्यात येईल. यंदा ही शर्यत मुंबई ते खंडाळा आणि खंडाळा ते पुणे अशा दोन टप्प्यांत होणार आहे. या दोन टप्प्यांमध्ये ३० मिनिटांचा अवधी असेल. पुण्यामध्ये येताना स्पर्धक एकटे येत असल्यामुळे प्रेक्षकांसाठी स्पर्धा कंटाळवाणी होते. त्यामुळे यंदा हा बदल केल्याचे आयोजकांनी सांगितले. पुणे येथे अंतिम रेषा पार करणाऱ्या प्रथम १६ स्पर्धकांना रोख पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. शिवाय पनवेल, खोपोली, बोर घाट या टप्प्यावर विजयी सायकलपटूंचादेखील सन्मान करण्यात येणार आहे. स्पर्धेतील अत्यंत खडतर बोर घाट प्रथम पार करणाऱ्या सायकलपटूस ‘घाटाचा राजा’ या किताबासह रोख ३१ हजार रुपयांच्या बक्षिसाने गौरविण्यात येईल. तसेच या ठिकाणी येणाऱ्या पहिल्या ११ सायकलपटूंनाही रोख पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. विशेष म्हणजे बोर घाटात पहिल्या येणाऱ्या सायकलपटूनंतर १५ मिनिटांत पोहोचणारे सर्व सायकलपटू स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र ठरतील. त्यामुळे यंदा मोठी चुरस दिसून येईल. खंडाळा - पुणे हा दुसरा टप्पा येथून ३० मिनिटांनी सुरू होईल. (क्रीडा प्रतिनिधी)आतापर्यंत स्पर्धेत देशभरातील ७८ सायकलपटूंनी आपला सहभाग निश्चित केला आहे. यामध्ये महाराष्ट्रासह राजस्थान, कर्नाटक, मध्य रेल्वे, दक्षिण - मध्य रेल्वे, सेना दल, पंजाब, उत्तर प्रदेश, गुजरात आणि आंध्र प्रदेश या राज्यातील सर्वोत्तम सायकलपटूंचा सहभाग आहे.