मोहोळमधील कुस्ती स्पर्धेत ५० हून अधिक मल्लांचा सहभाग

By Admin | Updated: July 12, 2014 22:06 IST2014-07-12T22:06:25+5:302014-07-12T22:06:25+5:30

मोहोळ: शाहू परिवार व सिद्ध नागेश कुस्ती केंद्र, मोहोळ यांच्या वतीने रविवार, दि़ १३ जुलै रोजी आयोजित कुस्ती स्पर्धेत ५० हून अधिक मल्ल सहभाग नोंदविणार आहेत़ बीपीएड कॉलेजच्या मैदानावर होणार्‍या या स्पर्धेसाठी २ हजारांपासून ७५ हजार रुपयांपर्यंतची बक्षिसे ठेवण्यात आल्याचे कुस्ती समिती प्रमुख चंद्रकांत काळे यांनी कळविले आहे़

More than 50 wrestlers participate in the wrestling championship in Mohol | मोहोळमधील कुस्ती स्पर्धेत ५० हून अधिक मल्लांचा सहभाग

मोहोळमधील कुस्ती स्पर्धेत ५० हून अधिक मल्लांचा सहभाग

होळ: शाहू परिवार व सिद्ध नागेश कुस्ती केंद्र, मोहोळ यांच्या वतीने रविवार, दि़ १३ जुलै रोजी आयोजित कुस्ती स्पर्धेत ५० हून अधिक मल्ल सहभाग नोंदविणार आहेत़ बीपीएड कॉलेजच्या मैदानावर होणार्‍या या स्पर्धेसाठी २ हजारांपासून ७५ हजार रुपयांपर्यंतची बक्षिसे ठेवण्यात आल्याचे कुस्ती समिती प्रमुख चंद्रकांत काळे यांनी कळविले आहे़
या स्पर्धेचे उद्घाटन आमदार भारत भालके, आमदार दीपक साळुंखे, कल्याणाराव काळे यांच्या उपस्थितीत होणार आहे़ यावेळी आमदार लक्ष्मण ढोबळे, माजी आमदार राजन पाटील, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे आदी उपस्थित राहणार आहेत़
या आखाड्यात महाराष्ट्र केसरी समाधान घोडके व संग्राम पोळ तर गणेश वाघमोडे आणि विजय माने (सोलापूर) यांच्यातील लढती रंगतदार होणार आहेत़
यासाठी अशोक धोत्रे, तनाजी बनसोडे, धनाजी व्यवहारे, हणुमंत वाघमोडे, दिकन वाघमोडे, अण्णा आलेकर हे परिश्रम घेत आहेत़ (वार्ताहर)

Web Title: More than 50 wrestlers participate in the wrestling championship in Mohol