शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
5
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
6
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
7
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
8
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
9
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
10
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
11
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
12
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
13
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
14
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
15
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
16
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
17
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
18
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
19
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
20
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल

एमके कौशिक, रवींदर पाल यांचे कोरोनामुळे निधन, मॉस्को ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण विजेत्या भारतीय हॉकी संघाचे होते सदस्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2021 4:10 AM

सीतापूर येथे जन्मलेले रवींदर पाल हे सेंटर हाफ खेळायचे. १९७९ आणि १९८४ या काळात दोन (मास्को तसेच लॉस एंजिलिस)ऑलिम्पिकशिवाय १९८० आणि १९८३ची चॅम्पियन्स चषक स्पर्धा, १९८२ चा विश्वचषक आणि त्याचवर्षी झालेल्या आशिया चषक स्पर्धेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले.

नवी दिल्ली : १९८० च्या मॉस्को ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या भारतीयहॉकी संघाचे सदस्य  महाराज कृष्ण कौशिक आणि  रवींदर पालसिंग यांचे कोरोनामुळे शनिवारी निधन झाले. कौशिक हे ६६ तर रविंदर ६० वर्षांचे होते. रविंदर अविवाहित होते. कौशिक यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा आहे. कौशिक यांना १७ एप्रिल रोजी कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांना स्थानिक नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले होते. सायंकाळी त्यांना कृत्रिम श्वासप्रणालीवर ठेवण्यात आले होते. (MK Kaushik, Ravinder Pal death due to corona) दरम्यान, १९८४ मध्ये लॉस एंजेलिस ऑलिम्पिक खेळणारे रवींदर पाल यांना २४ एप्रिलला विवेकानंद रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन आठवडे कोरोनाशी झुंज दिल्यानंतर शनिवारी सकाळी लखनौमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींदर यांनी कोरोनावर मात केली. निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना कोरोना वॉर्डातून हलविण्यात आले होते; मात्र शुक्रवारी त्यांची प्रकृती पुन्हा खालावल्याने त्यांना कृत्रिम श्वसनप्रणालीवर ठेवण्यात आले होते. त्यांच्या पश्चात पुतणी प्रज्ञा यादव आहे. रवींदर यांनी हॉकी सोडल्यानंतर स्टेट बँकेतूनही स्वच्छानिवृत्ती घेतली होती. केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू आणि हॉकी इंडियाने त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

कौशिक यांनी भारताच्या सिनियर पुरुष आणि महिला संघाला प्रशिक्षण दिले. त्यांच्या मार्गदर्शनात भारताच्या पुरुष संघाने बँकॉक येथे १९९८ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकले होते. याशिवाय, महिला संघानेदेखील दोहा आशियाई क्रीडा स्पर्धेत २००६ ला कांस्यपदक जिंकले. त्यांना १९९८ ला अर्जुन पुरस्कार तसेच २००२ ला द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

सीतापूर येथे जन्मलेले रवींदर पाल हे सेंटर हाफ खेळायचे. १९७९ आणि १९८४ या काळात दोन (मास्को तसेच लॉस एंजिलिस)ऑलिम्पिकशिवाय १९८० आणि १९८३ची चॅम्पियन्स चषक स्पर्धा, १९८२ चा विश्वचषक आणि त्याचवर्षी झालेल्या आशिया चषक स्पर्धेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. 

टॅग्स :HockeyहॉकीIndiaभारत