इंग्लंड दौऱ्यासाठी मिताली कर्णधार

By Admin | Updated: July 18, 2014 02:16 IST2014-07-18T02:16:59+5:302014-07-18T02:16:59+5:30

इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय महिला संघ जाहीर करण्यात आला आहे़ संघाच्या कर्णधारपदी मिताली राज हीच राहणार आहे़

Mithali captain for England tour | इंग्लंड दौऱ्यासाठी मिताली कर्णधार

इंग्लंड दौऱ्यासाठी मिताली कर्णधार

मुंबई : इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय महिला संघ जाहीर करण्यात आला आहे़ संघाच्या कर्णधारपदी मिताली राज हीच राहणार आहे़ या दौऱ्यात भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध एक चारदिवसीय कसोटी आणि ३ वन-डे सामन्यांची मालिका खेळणार आहे़
या दौऱ्याची सुरुवात ७ आॅगस्ट रोजी होणाऱ्या सराव सामन्याने होणार आहे़ त्यानंतर १३ ते १६ आॅगस्टदरम्यान ओरम्बस्ले येथे भारतीय आणि इंग्लंड संघात पहिली कसोटी होईल़ विशेष म्हणजे भारतीय महिला संघ आठ वर्षांत पहिल्यांदाच इंग्लंड विरुद्ध कसोटी खेळणार आहे़
भारतीय संघ : मिताली राज (कर्णधार), करुणा जैन (उपकर्णधार), स्मृती मानधाना, ए़ डी़ थिरुषकामिनी, पूनम राऊत, हरमनप्रीत कौर, झुलन गोस्वामी, निरंजना एन., शुभालक्ष्मी शर्मा, राजेश्वरी गायकवाड, एकता बिष्ट, पूनम यादव, स्वागतिका आऱ, वनिथा व्ही.आर., सुषमा वर्मा़ (वृत्तसंस्था)
 

Web Title: Mithali captain for England tour