मेस्सीच्या २ गोलने बार्सिलोना विजयी

By Admin | Updated: September 21, 2015 23:48 IST2015-09-21T23:48:00+5:302015-09-21T23:48:00+5:30

लियोनेल मेस्सीने केलेल्या दोन गोलच्या बळावर बार्सिलोनाने लेवांटे संघाचा ४-१ असा दणदणीत पराभव करताना लिगा फुटबॉलमध्ये आतापर्यंतच्या चारही

Messi's 2 goals Barcelona won | मेस्सीच्या २ गोलने बार्सिलोना विजयी

मेस्सीच्या २ गोलने बार्सिलोना विजयी

माद्रिद : लियोनेल मेस्सीने केलेल्या दोन गोलच्या बळावर बार्सिलोनाने लेवांटे संघाचा ४-१ असा दणदणीत पराभव करताना लिगा फुटबॉलमध्ये आतापर्यंतच्या चारही सामन्यांत विजय मिळविण्याचा रेकॉर्ड कायम ठेवला.
युरोपियन चॅम्पियन संघ आता रियाल माद्रिद, विलारीयाल
आणि सेल्टा विगो यांच्यापेक्षा दोन गुणांनी पुढे आहे, तर एटलेटिको माद्रिद त्यांच्यापेक्षा तीन गुणांनी मागे आहे.
मेस्सीने दोनदा पेनल्टीवर गोल करण्याची संधी हुकवली; परंतु त्याने चुकी सुधारताना दोन गोल केले. सुआरेज आणि आंद्रेस
इनिएस्ताच्या अनुपस्थितीत मेस्सीने मिडफिल्डची जबाबदारी यशस्वीपणे पेलली आणि आपल्या संघाला निराश केले नाही. नेमारनेदेखील एक गोल केला.
याआधी पहिल्या युरोप लीग विजेता सेविला संघाला सेल्टा विगोने २-१ गोेलने पराभूत केले. विलारीयालने एथलेटिक बिलबाओचा ३-१ असा पराभव करताना तिसऱ्या क्रमांकावर कब्जा केला. (वृत्तसंस्था)

Web Title: Messi's 2 goals Barcelona won