शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
5
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
6
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
7
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
8
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
9
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
10
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
11
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
12
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
13
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
14
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
15
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
16
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
17
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
18
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
19
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
Daily Top 2Weekly Top 5

मेरी, सरिताचा सुवर्णपंच

By admin | Updated: February 17, 2016 02:41 IST

एम. सी. मेरी कोम व पूजा राणी यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना नॉकआऊट केले. तर एल. सरिता देवीने प्रतिकूल परिस्थितीनंतर विजय मिळवला.

शिलाँग : एम. सी. मेरी कोम व पूजा राणी यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना नॉकआऊट केले. तर एल. सरिता देवीने प्रतिकूल परिस्थितीनंतर विजय मिळवला. भारताने महिला बॉक्सिंगमध्ये तिन्ही सुवर्णपदके पटकावत १२ व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत क्लीन स्वीप करण्यात यश मिळवले. खांद्याच्या दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन करीत असलेल्या लंडन आॅलिम्पिकच्या कांस्यपदक विजेत्या मेरी कोमने (५१ किलो) श्रीलंकन प्रतिस्पर्धी अनुशा कोदितुवाकू दिलरुक्शीवर ठोशांचा मारा केला. ही लढत ९० सेकंदांपेक्षा कमी वेळ चालली. भारतीय खेळाडूला तांत्रिक नॉकआऊटच्या आधारावर विजयी घोषित करण्यात आले. मेरीच्या जोरकस ठोशांपासून बचाव करताना अनुशाचे संतुलन बिघडले आणि तिच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली. त्यामुळे वैद्यकीय टाईम आऊट घ्यावा लागला. पाच वेळ विश्व विजेतेपदाचा मान मिळवणाऱ्या मेरीने त्यानंतर जोरकस ठोसा मारीत तिला जवळजवळ रिंगच्या बाहेर केले होते, पण रेफ्रीने लगेच हस्तक्षेप केला. अनुशाला दुखापतीतून सावरण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. अनुशाने २००३ च्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावले होते. तिने मेरीला कडवे आव्हान देण्याचे वक्तव्य केले होते. याबाबत विचारले असता मेरी कोम म्हणाली,‘‘मला कुणी आव्हान दिले, तर मला चांगले वाटते. लढतीपूर्वी वक्तव्य करीत नाही, पण मानसिकदृष्ट्या सकारात्मक असते. आई झाल्यानंतर पुनरागमन करणे सोपे नसते. मी आत्मविश्वास कायम राखण्यासाठी आताही सराव करते.’’ मेरी कोमच्या चमकदार सुरुवातीनंतर इंचियोन आशियाई क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक विजेती पूजाराणी देवी हिने ७५ किलो वजन गटात नीलांती आंद्रावीरला नॉकआऊट केले. ही लढत केवळ एका फेरीत आटोपली. वर्षभराच्या बंदीनंतर पुनरागमन करणाऱ्या सरिता देवीने श्रीलंकेच्या एम. विदुषिका प्रबाधीविरुद्ध संघर्षपूर्ण विजय मिळवला. इंचियोन क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या खेळाडूने पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये चांगली कामगिरी केली, पण तिची प्रतिस्पर्धी असलेल्या खेळाडूने तिसऱ्या फेरीत शानदार पुनरागमन केले. सरिता दोनदा खाली पडली. अखेर सरिताने या लढतीत ३९-३६ च्या फरकाने विजय मिळवला. भारताने बॉक्सिंगमध्ये सर्व १० सुवर्णपदके पटकावली. यापूर्वी पुरुष विभागात सोमवारी भारताने सात सुवर्णपदके पटकावली होती. (वृत्तसंस्था)