शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

मुष्टीयुध्दात मनोजकुमार संघर्षपूर्ण लढतीत पराभूत

By admin | Updated: August 15, 2016 05:42 IST

राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता बॉक्सर मनोज कुमारने (६४ किलो) रविवारी आॅलिम्पिकच्या उपउपांत्यपूर्व फेरीत लढवय्या खेळ केला

रिओ : राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता बॉक्सर मनोज कुमारने (६४ किलो) रविवारी आॅलिम्पिकच्या उपउपांत्यपूर्व फेरीत लढवय्या खेळ केला, पण अखेर त्याला उज्बेकिस्तानच्या फजलीद्दीन गैबनाजारोव्हविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. २९ वर्षीय भारतीय बॉक्सर्सने ही लढत ०-३ फरकाने गमावली. २५ वर्षीय गैबानाजारोव्ह विश्व व आशियाई स्पर्धेतील रौप्यपदक विजेता आहे. तो भारतीय बॉक्सरच्या तुलनेत सरस होता, पण मनोजने लढवय्या खेळ करीत सर्वांचे लक्ष वेधले. पहिल्या फेरीत मनोजने प्रतिस्पर्ध्याविरुद्ध अंतर राखत त्याला ठोसे लगावण्याची संधी दिली नाही. ही रणनीती उज्बेकिस्तानचा बॉक्सरला त्रस्त करण्यास पुरेशी होती, पण गैबनाजारोव्हने अखेरच्या सेकंदामध्ये डाव्या हाताने दोन पंच लगावत पहिली फेरी जिंकली. दुसऱ्या फेरीत उज्बेकिस्तानच्या बॉक्सरने वर्चस्व गाजवत चांगले पंच लगावले. मनोजला आपल्या उंचीचा लाभ घेता आला नाही. प्रतिस्पर्धी बॉक्सर्सच्या जोरकस ठोश्यांमुळे तो दडपणाखाली आला, पण त्याने लढवय्या बाणा कायम राखला. अखेरच्या फेरीत हरियाणाच्या बॉक्सरने आक्रमक खेळ केला, पण गैबनाजोरोव्हच्या फुटवर्कमुळे त्याला संधी मिळाली नाही. सर्व जजेसनी गैबनाजारोव्हच्या बाजूने निकाल दिला, खिलाडूवृत्ती दाखविताना त्याने मनोजची गळाभेट घेतली आणि त्याच्या खेळाची प्रशंसा केली. मनोज आणि पहिल्या फेरीत पराभूत होणारा शिव थापा (५६ किलो) यांचे आव्हान संपुष्टात आले आहे. आता भारताचे आव्हान केवळ विकास कृष्णच्या (७५ किलो) कामगिरीवर अवलंबून आहे. विकासची लढत सोमवारी होणार आहे. (वृत्तसंस्था)