Maharashtra team announces for Junior National Bodybuilding Tournament | ज्युनिअर राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर

ज्युनिअर राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर

आंध्र प्रदेश येथे दिनांक ०१ - ०२ फेब्रुवारी २०२० रोजी होणाऱ्या १०व्या ज्युनिअर / मास्टर्स / दिव्यांग राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी नुकत्याच सिन्नर येथे झालेल्या राज्य स्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेदरम्यान महाराष्ट्र संघ जाहीर करण्यात आला. महाराष्ट्राचा संघ ३० जानेवारी रोजी मुंबई वरून आंध्र प्रदेश ला प्रस्थान करेल. ज्युनिअर महाराष्ट्र श्री विजेता सौरव शेट्टी, जुनिअर मुंबई श्री विजेता वैभव जाधव, खुशाल सिंग यांच्याकडून महाराष्ट्र संघाला सुवर्ण पदकाची अपेक्षा असून महाराष्ट्र संघातील इतर खेळाडूही चांगली कामगिरी करून महाराष्ट्र संघाला सांघिक विजेतेपद मिळवून देतील अशा अपेक्षा महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेचे  अध्यक्ष श्री प्रशांत आपटे यांनी व्यक्त केल्या. 
महाराष्ट्र संघ पुढीलप्रमाणे राहील. 
ज्युनियर (२१ वर्षाखालील)
५५ किलो - १) प्रशांत सडेकर - मुंबई उपनगर, 2) सुमित शेडगे - रायगड  ६०किलो - १) प्रितेश गमरे -  मुंबई, २) निमिश निकम -  मुंबई उपनगर, ६५ किलो - १) वैभव जाधव -  मुंबई   ७० किलो - १)ऋशिकेश कोसरकर - कोल्हापूर २) निखिल राणे - मुंबई उपनगर,  ७५ किलो - १) खुशाल  सिंग -  मुंबई उपनगर २)  प्रफुल्ल पाटील - मुंबई, ७५ किलो वरील - १) सौरभ शेट्टी - ठाणे २) अंकित देशमुख - सातारा

मास्टर्स -  ४० - ५० वयोगट - १) मो.शब्बीर शेख - मुंबई उपनगर २) संजय नडगावकर - मुंबई ३) रमेश पेवेकर - मुंबई 

मास्टर्स - ५० - ६० वयोगट - १) गणेश देवाडीगा - ठाणे २) मनिष पोकळे -  पुणे ३) शशिकांत जगदाळे  - मुंबई 

मास्टर्स - ६० वर्षांवरील - १) हरून सिद्दिक - बीड  २)  दत्तात्रय भट -  मुंबई उपनगर  ३) प्रमोद जाधव  - मुंबई 

दिव्यांग - ६५ किलो - १) सुदिश शेट्टी - मुंबई उपनगर २) प्रथमेश भोसले - मुंबई उपनगर ३) रियाज राय - मुंबई उपनगर ४) प्रतिक मोहीते - रायगड

दिव्यांग - ६५ किलो वरील - १) दिनेश चव्हाण - ठाणे २) खंडोबा सुर्यवंशी -  पुणे ३) हुसेन शेख - नाशिक ४) कणकेश्वर  रसाळ  - रायगड

वुमेन्स माॅडेल फिजीक (३० वर्षे वयावरील) - १) निशरीन पारीख - मुंबई २) मंजिरी भावसार - मुंबई

प्रशिक्षक - संतोष तावडे, व्यवस्थापक - विजय  पुजारी

Web Title: Maharashtra team announces for Junior National Bodybuilding Tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.