शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

महाराष्ट्र केसरी 2020 : हर्षवर्धन सदगीर ठरला मानाच्या 'महाराष्ट्र केसरी'चा विजेता

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2020 6:39 PM

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत यंदा अंतिम सामन्यात चांगलीच लढत पाहायला मिळाली.

पुणे : 'आर्मी मॅन' शैलेश शेळके आणि हर्षवर्धन सदगीर यांच्यामध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धेची अंतिम फेरी चांगलीच रंगली. रंजकदार झालेल्या या स्पर्धेत अखेर बाजी मारत हर्षवर्धन सदगीरने 'महाराष्ट्र केसरीची मानाची गदा'  पटकावली. यापूर्वी एकदाही त्याला हे जेतेपद पटकावता आले नव्हते. हर्षवर्धनने अंतिम लढतीचा सामना ३-२ असा जिंकत जेतेपद पटकावले.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत यंदा अंतिम सामन्यात चांगलीच लढत पाहायला मिळाली. यापूर्वी या दोघांनी एकदाही या स्पर्धेचे जेतेपद पटकावलेले नव्हते. त्यामुळे यावेळी महाराष्ट्र केसरीला नवा विजेता मिळणार हे माहिती होते. पण शैलेश की हर्षवर्धन यांच्यातून नेमका कोण बाजी मारणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली होती.

विशेष म्हणजे दोन्ही महाराष्ट्र केसरी पैलवानांना चीतपट करत लातूरच्या शैलेश शेळके अन् नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर यांनी महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यामुळे, महाराष्ट्र केसरीची गदा मराठवाड्याला मिळणार की उत्तर महाराष्ट्राला याचीही उत्कंठा दोन्ही विभागातील कुस्ती शौकिनांना लागली होती. 

लातूरचा शैलेश शेळके (आर्मी मॅन)

मूळ लातूर जिल्ह्यातील असणारा शैलेश शेळके गेली कित्येक वर्षे आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल पुणे येथे अर्जुनवीर काकासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. बॉम्बे इंजीनियरिंग वर्क्स खडकी पुणे या युनिटमध्ये भारतीय सैन्य दलाचा तो पैलवान आहे. सुभेदार सोपान शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने आजवर राज्य, राष्ट्रीय स्पर्धेत उत्तम कामगिरी केली आहे. कुस्तीमध्ये आक्रमक असणारा शैलेश इतर पैलवानांप्रमाणेच वैयक्तिक जीवनात अतिशय विनम्र आहे. शैलेश हा यावर्षी अतिशय तुफानी कामगिरी करीत अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेला आहे. 

मूळ अहमदनगरचा हर्षवर्धन सदगीर

मूळचा अहमदनगर जिल्ह्याचा सुपुत्र असणारा हर्षवर्धन सदगीर हा नाशिक जिल्ह्याकडून कित्येक वर्ष महाराष्ट्र केसरीचं प्रतिनिधित्व करणारा पैलवान आहे. हर्षवर्धन हा एका शिक्षकाचा मुलगा असून त्याचे आजोबा नामांकित पैलवान होते. पाच वर्षांपासून तो आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल वस्ताद अर्जुन वीर काकासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मल्लविद्येचे धडे गिरवत आहे. यावर्षी शिर्डी येथे झालेल्या 23 वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ग्रीको-रोमन कुस्ती प्रकारात त्याने पदक मिळवले आहे. तसेच वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा हरियाणा येथे सुद्धा त्याने पदकाची कमाई केली आहे. गतवर्षी जालना येथील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत उपांत्य फेरीत येऊनसुद्धा पैलवान हर्षवर्धनने स्पर्धेतून माघार घेतली होती. मात्र, यंदा महाराष्ट्र केसरीची गदा घ्यायचीच, अशा निर्धाराने हर्षवर्धन अंतिम फेरीपर्यंत पोहोचला आहे. 

टॅग्स :Maharashtra Kesariमहाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धाWrestlingकुस्तीMaharashtraमहाराष्ट्रlaturलातूरNashikनाशिकAhmednagarअहमदनगर