शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

ज्युनियर राष्ट्रीय पिकलबॉल स्पर्धेत महाराष्ट्र चॅम्पियन

By admin | Updated: June 14, 2017 18:28 IST

पहिल्या राष्ट्रीय ज्युनिअर पिकलबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाने वर्चस्व राखताना सांघिक विजेतेपदाला गवसणी घातली.

 रोहित नाईक/ऑनलाइन लोकमतडेहराडून, दि. 14 - येथे झालेल्या पहिल्या राष्ट्रीय ज्युनिअर पिकलबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाने वर्चस्व राखताना सांघिक विजेतेपदाला गवसणी घातली. तसेच, ज्युनिअर स्पर्धेसोबतच आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या फेडरेशनक कप पिकलबॉल स्पर्धेत मात्र राजस्थानने बाजी मारली. निर्णायक सामन्यांमध्ये केलेल्या चुकांमुळे महाराष्ट्राला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. डेहराडून येथील परेड मैदानावर झालेल्या या स्पर्धेत ज्यूनिअर गटात महाराष्ट्राने जबरदस्त खेळ केला. महाराष्ट्राच्या खेळाडूंमध्ये झालेल्या मुलांच्या अंतिम सामन्यात कृष्णा मंत्रीने यश पाटीलचा ११-१, ११-४ असा धुव्वा उडवून सुवर्ण पदक पटकावले. मुलींच्या गटात मात्र राजस्थानच्या गीतम शर्माने बाजी मारत यजमान उत्तराखंडच्या खुशी थोपाचे आव्हान ११-१, ११-० असे परतावले. तसेच, कांस्य पदकाची लढत महाराष्ट्राच्याच खेळाडूंमध्ये झाली. साक्षी बाविस्करने ॠतुजा कालिकेचा ११-५, ११-० असा पराभव केला. मुलांच्या दुहेरी अंतिम लढतीत अजय चौधरी - मयूर पाटील या महाराष्ट्राच्या जोडीने सुवर्ण पटकावताना झारखंडच्या मोहम्मद जैद - मोहम्मद शाबिद अन्सारी यांचा ११-३, ११-४ असा फडशा पाडला. मुलींच्या दुहेरीमध्ये इशीका मालोदे - सलोनी देवडा या महाराष्ट्राच्या जोडीने समिक्षा शेखावत - साक्षी शेखावत या राजस्थानच्या जोडीचा ११-४, ११-२ असा धुव्वा उडवला. मिश्र दुहेरीत निशा बरेला - कुलदीप महाजन या महाराष्ट्राच्या जोडीने तुफानी खेळ करताना कुलदीप - पिंकी या दिल्लीकरांचा ११-१, ११-० असा फडशा पाडून सुवर्ण पटकावले.   फेडरेशनमध्ये राजस्थान अव्वलज्यूनिअर गटात वर्चस्व राखलेल्या महाराष्ट्राला फेडरेशन कपमध्ये लौकिकास साजेशा खेळ करता आला नाही. राजस्थानने सांघिक जेतेपदावर कब्जा केला, तर महाराष्ट्राला निर्णायक सामन्यात केलेल्या चुकांचा फटका बसला. पुरुष एकेरीत महाराष्ट्राच्या आशिष महाजनला सामन्यादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. राजस्थानच्या निखिल सिरोहने सुवर्ण पटकावले. महिलांचा अंतिम सामना राजस्थानच्या खेळाडूंमध्येच रंगला. महिला दुहेरीतही महाराष्ट्राला राजस्थानविरुध्द पराभव पत्करावा लागल्याने रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. पुरुष दुहेरीत यजमान उत्तराखंडने बाजी मारली. मिश्र दुहेरीत मात्र महाराष्ट्राचा आंतरराष्ट्रीय खेळाडू अतुल एडवर्डने युवा साक्षी बाविस्करसह खेळताना अश्वनी वधोवा - कविता शेखावत या राजस्थानच्या जोडीचे आव्हान ११-३, ११-५ असे संपवले. फेडरेशन कपमध्ये हे महाराष्ट्राचे एकमेव सुवर्ण ठरले.