शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

मेरी कोमच्या खांद्याला खांदा लावून महाराष्ट्राचा खेळाडू लढला; जिंकलं पहिलंच आंतरराष्ट्रीय सुवर्ण

By स्वदेश घाणेकर | Published: July 29, 2019 11:58 AM

इंडोनेशियातील लाबुऑनबाजो येथे झालेल्या अध्यक्षीय चषक बॉक्सिंग स्पर्धेत भारतीय संघाने सात सुवर्ण आणि दोन रौप्यपदकं पटकावली.

मुंबई : इंडोनेशियातील लाबुऑनबाजो येथे झालेल्या अध्यक्षीय चषक बॉक्सिंग स्पर्धेत भारतीय संघाने सात सुवर्ण आणि दोन रौप्यपदकं पटकावली. सहा विश्व अजिंक्यपद नावावर असलेल्या दिग्गज बॉक्सर मेरी कोमचे सुवर्ण या स्पर्धेतील चर्चेचा विषय ठरले. बऱ्याच दिवसांनंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पुनरागमन करणाऱ्या अपेक्षित कामगिरी करताना सुवर्णपदक जिंकले. तिच्यासह सिमरनजित कौर, जमुना बोरो,  मोनिका, अंकुश दाहिया, नीरज स्वामी, अंनता चोपडे यांनीही भारताला सुवर्णपदक पटकावून दिले. भारतीय संघाने या स्पर्धेत सर्वोत्तम संघाचा मानही मिळवला.बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील सावना गावच्या अनंताचे हे आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील पहिलेच सुवर्णपदक आहे. महाराष्ट्राच्या शिवछत्रपती पुरस्कार विजेता खेळाडू व सध्या भारतीय संघाचा प्रशिक्षक गिरीश पवार याचे मार्गदर्शन लाभले. मागील वर्षी पुणे येथे आर्मी स्पोर्ट इंस्टिट्यूट येथे झालेल्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत अनंताने महाराष्ट्रासाठी रौप्यपदक जिंकले होते. रेल्वेत नोकरी करत असलेल्या अध्यक्षीय बॉक्सिंग स्पर्धेत 52 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात अफगाणिस्तानच्या रहमानी आर. चा 5-0 असा सहज पराभव केला. 

अकोला जिल्ह्यातील राज्य शासनाच्या क्रीडा प्रबोधिनीत सतीशचंद्र भट यांच्या देखरेखीखाली अनंतानं बॉक्सिंगचे धडे गिरवले. 2009 पासून त्यानं बॉक्सिंग खेळायला सुरुवात केली. त्यानंतर त्यानं राज्य व राष्ट्रीय स्पर्धांत आपला दबदबा दाखवून दिला. लोकमतशी बोलताना तो म्हणाला,'' मोठ्या खेळाडूंसोबत खेळण्याचे स्वप्न होते, ते आज पूर्ण झाले. हे पदक आत्मविश्वास वाढवणारे आहे. आता खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय बॉक्सिंगचा प्रवास सुरू झाला आहे.''  अनंताचे वडील शेतकरी आहेत, तर मोठा भाऊ रिक्षा चालवतो. 

21 वर्षीय अनंतानं 2010मध्ये कोलकाता येथे झालेल्या सब-ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेत ( 2010) सुवर्णपदकाची कमाई केली.  पुढच्याच वर्षी त्याला कांस्यपदक समाधान मानावे लागले. 2016मध्ये युवा स्पर्धेतील कांस्यपदक त्याच्या नावावर आहे.  याच वर्षी त्यानं वरिष्ठ गटात पदार्पण केले. गुवाहाटी येथे झालेल्या पहिल्या वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत त्यानं कांस्यपदक जिंकले. 2018मध्ये त्याने पुण्यात झालेल्या स्पर्धेत कांस्यचे रौप्यपदकात रुपांतर केले.  

टॅग्स :boxingबॉक्सिंगAkolaअकोलाbuldhanaबुलडाणा