शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेश ठेवणार मदरसा बंद

By admin | Updated: June 7, 2015 01:04 IST

बांगलादेशाच्या अधिकाऱ्यांनी भारतीय संघाच्या आगामी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील स्टेडियमजवळ असलेला एक इस्लामी मदरसा बंद केला असून चिथावणी देणाऱ्या बॅनरवर बंदी घातली आहे.

ढाका : बांगलादेशाच्या अधिकाऱ्यांनी भारतीय संघाच्या आगामी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील स्टेडियमजवळ असलेला एक इस्लामी मदरसा बंद केला असून चिथावणी देणाऱ्या बॅनरवर बंदी घातली आहे. अधिकाऱ्यांनी शनिवारी याबाबत माहिती दिली. रौजातुन सलहीन अलीम मदरसाचे प्रमुख मौलाना अब्दुस शकूर म्हणाले की, ‘आम्हाला अधिकाऱ्यांकडून एक पत्र मिळाले. त्यात पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान १० ते १४ जून या कालावधीत मदरसा बंद ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे.’ मौलाना शकूर पुढे म्हणाले, ‘प्रशासनातर्फे मदरसा बंद ठेवण्यास प्रथमच सांगण्यात आले आहे.’ फतुल्लाह स्टेडियममध्ये नऊ वर्षांनंतर प्रथमच कसोटी सामना खेळल्या जाणार आहे. यापूर्वी आॅस्ट्रेलियाविरुद्ध या स्टेडियममध्ये २००६ मध्ये कसोटी सामना खेळला गेला होता. आजतागायत या स्टेडियममध्ये १० वन-डे सामने खेळल्या गेले आहेत. त्यात आशिया कप २०१४ च्या स्पर्धेदरम्यान खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांचा समावेश आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे सुरक्षा प्रमुख हुसेन इमाम म्हणाले की, भारतीय क्रिकेटपटूंना चोख सुरक्षा व्यवस्था पुरविण्यासाठी मदरसा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. भारतीय संघ एक कसोटी व तीन वन-डे सामन्यांची मालिका खेळण्यासाठी सोमवारी बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. मौलान शकूर प्रशासनाच्या निर्णयामुळे स्तंभित झाले. कारण गेल्या वर्षी आशिया कप स्पर्धेदरम्यानही मदरसा बंद करण्यात आलेला नव्हता व नियमित शाखांचे संचलन झालेले होते. शकूर म्हणाले,‘यावेळी आम्हाला पाच दिवसांची सुटी जाहीर करण्याची सूचना मिळाली आहे. आम्हाला मानवतेच्या आधारावर केवळ २५ अनाथ बालकांना आमच्या वसतिगृहात ठेवण्याची तोंडी परवानगी मिळाली आहे.’ बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये एका ब्लॉगरच्या हत्या प्रकरणात मदरसामधील दोन विद्यार्थ्यांना अटक करण्यात आल्यानंतर बांगलादेशमधील मदरसे चर्चेत आहेत.क्रिकेट बोर्डाचा अधिकारी म्हणाला, यंदा विश्वकप स्पर्धेदरम्यान झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे. विश्वकप क्रिकेट स्पर्धेदरम्यान पंचांचे काही निर्णय बांगलादेश संघाच्या विरोधात गेल्यामुळे येथील क्रिकेट चाहते संतापले होते. भाराताविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यामुळे बांगलादेश संघाच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा संपुष्टात आल्या. बांगलादेश मूळचे आयसीसीचे तत्कालीन अध्यक्ष मुस्तफा कमाल यांनी त्यावेळी भारत बलाढ्य असल्यामुळे पंचांनी त्यांच्या बाजूने निर्णय दिले, असे वक्तव्य केल्यामुळे वाद आणखी चिघळला होता. इमाम म्हणाले की, अधिकाऱ्यांनी सामन्यादरम्यान स्टँडमध्ये भारतविरोधी बॅनरवर बंदी घातली आहे. (वृत्तसंस्था)