शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
3
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
4
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
5
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
6
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
7
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
8
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
9
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
10
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
11
१.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश
12
“१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य, अन्यथा परवाने रद्द”: प्रताप सरनाईक
13
अमेरिका-इराण युद्धामुळे पेट्रोल-डिझेल महागणार? अमेरिकेनं सुरू केली नाकेबंदी; भारताला बसणार मोठा फटका?
14
Chanakya Niti: शत्रू समोरून वार करतो, पण मित्र पाठीमागून! धोका टाळण्यासाठी चाणक्य नीतीचे महत्त्वाचे नियम
15
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
16
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
17
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
18
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
19
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
Daily Top 2Weekly Top 5

दुती चंदकडे देशाचे नेतृत्व

By admin | Updated: April 21, 2017 01:53 IST

भारताची अव्वल धावपटू दुती चंद हिच्या नेतृत्वाखाली आगामी आशियाई ग्रां. प्री. २०१७च्या तीन सत्रांमध्ये सहभागी होण्यासाठी १६ सदस्यांचा भारतीय संघ शनिवारी चीनला

नवी दिल्ली : भारताची अव्वल धावपटू दुती चंद हिच्या नेतृत्वाखाली आगामी आशियाई ग्रां. प्री. २०१७च्या तीन सत्रांमध्ये सहभागी होण्यासाठी १६ सदस्यांचा भारतीय संघ शनिवारी चीनला रवाना होईल. जियाजिंग आणि जिन्हुआ येथे अनुक्रमे २४ आणि २७ एप्रिलला स्पर्धेचे पहिले व दुसरे सत्र पार पडेल. यानंतर अंतिम सत्र ३० एप्रिलला चिनी तैपई येथे होईल. ४०० मी. शर्यतीतील राष्ट्रीय विक्रमवीर मोहम्मद अनास आणि इंचिओन आशियाई क्रीडा २०१४ क्रीडा स्पर्धेत ४०० मी. शर्यतीतील कांस्यपदक विजेती पूवम्मा राजू अंतिम सत्रादरम्यान भारतीय संघात सामील होतील. या दोन्ही खेळाडूंना चीनसाठी व्हिसा मिळालेला नाही. त्याच वेळी, उंच उडीतील नवोदित खेळाडू १७ वर्षीय तेजस्विनी शंकरला पाठीला झालेल्या दुखापतीमुळे भारतीय संघातील स्थान गमवावे लागले. गेल्या आठवड्यात झालेल्या या दुखापतीमुळे तिला भारतीय संघातून दूर करण्यात आले. दुती आणि रीना जॉर्ज महिलांच्या १०० मीटर शर्यतीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतील. त्याच वेळी, पुरुषांमध्ये विद्यासागर सिद्धारानयक याच्यावर भारताची मदार असेल. महिलांच्या ८०० मीटर शर्यतीत टिंगु लुका भारतासाठी पदक मिळवण्यास प्रयत्न करेल. तसेच गोळाफेकमध्ये मनप्रीत कौर भारताच्या वतीने आव्हान उभे करेल. नीरज चोप्रा आणि रविंदर सिंग भालाफेकची जबाबदारी पार पाडतील, तर राकेश बाबू तिहेरी उडी प्रकारामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करेल. लांब उडी आणि उंच उडीमध्ये अनुक्रमे नीना वाराकिल आणि जीनू मारिया यांच्यावर भारताच्या आशा असतील. (वृत्तसंस्था)