जोराची आली म्हणून केली लघुशंका - ख्रिस्तियानो रोनाल्डो

By Admin | Updated: June 2, 2015 19:31 IST2015-06-02T19:31:34+5:302015-06-02T19:31:34+5:30

सध्या फुटबॉल खेळाडूंविषयी वेगवेगळ्या चर्चांना ऊत आले आहे.

Kelly Urals as Towards The Rise - Cristiano Ronaldo | जोराची आली म्हणून केली लघुशंका - ख्रिस्तियानो रोनाल्डो

जोराची आली म्हणून केली लघुशंका - ख्रिस्तियानो रोनाल्डो

 ऑनलाइन लोकमत

फ्रान्स, दि. ०२ - सध्या फुटबॉल खेळाडूंविषयी वेगवेगळ्या चर्चांना ऊत आले  आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी येथे सुरु असलेल्या लीग मॅचच्या दरम्यान टॉपचा फुटबॉलपट्टू लिओनेल मेस्सी याला एका वृद्ध चाहत्यांने ऑटोग्राफ मागितला, यावेळी मेस्सी त्याच्याशी उद्धटपणे वागल्याचे निदर्शनास आले होते. त्यातच आता ख्रिस्तियानो रोनाल्डो याने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका केल्याने पुन्हा चर्चेचा विषय बनला आहे.
येथील एका हॉटेलमध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डो याने मित्रांसोबत रात्रभर पार्टी केल्यानंतर पहाटेच्या सुमारास  हे सर्वजण बाहेर पडले. बाहेर पडल्यानंतर  ख्रिस्तियानो रोनाल्डोने रस्त्याच्या एका बाजूला पार्क करण्यात आलेल्या गाडीच्यामागे जाऊन लघुशंका केली. हे करत असताना त्याला येथील स्थानिक पोलिसांनी पकडले.  यावेळी त्याने पोलिसांना असे सांगितले की,  मी परत हॉटेलमध्ये जायला हवे होते, परंतू मला जोराची आल्याने  कंट्रोल करणे शक्य नव्हते म्हणून मी रस्त्याच्या एका बाजूला असलेल्या गाडीच्यामागे जाऊन लघुशंका केली. 

Web Title: Kelly Urals as Towards The Rise - Cristiano Ronaldo