शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
3
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
4
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
5
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
6
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
7
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
8
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
9
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
10
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
11
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
12
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
13
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
14
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
15
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
16
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
17
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
18
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
19
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
20
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटक विजेतेपद राखणार?

By admin | Updated: March 17, 2015 01:01 IST

चमकदार कामगिरीच्या जोरावर सलग दुसऱ्यांदा रणजी विजेतेपद पटकावल्यानंतर, आता बलाढ्य कर्नाटक संघ सलग दुसऱ्यांदा इराणी ट्रॉफीवर कब्जा करण्यासाठी शेष भारत विरुध्द दोन हात करेल.

बंगळुरु : चमकदार कामगिरीच्या जोरावर सलग दुसऱ्यांदा रणजी विजेतेपद पटकावल्यानंतर, आता बलाढ्य कर्नाटक संघ सलग दुसऱ्यांदा इराणी ट्रॉफीवर कब्जा करण्यासाठी शेष भारत विरुध्द दोन हात करेल. मात्र कर्नाटकच्या या मोहिमेला जबर धक्का बसला आहे. अव्वल फलंदाज लोकेश राहूल स्नायूच्या दुखापतीने बेजार असल्याने तो खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. गतवर्षी कर्नाटकने शेष भारताचा एक डाव राखून दणदणीत पराभव केला होता. याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा निर्धार कर्णधार विनय कुमारने केला आहे. ५ सामन्यांतून ९३.११च्या शानदार सरासरीने कर्नाटकडून ८३८ धावा चोपणारा राहूल या सामन्यात खेळणार नसल्याने त्याची कमी कर्नाटकला नक्कीच भासेल. याविषयी विनय कुमारने सांगितले की, राहूल आमचा महत्त्वाचा फलंदाज असून त्याची कमी भासेल. अशा परिस्थितीत अभिषेक रेड्डी पदार्पण करेल. दुसऱ्या बाजूला यंदाच्या रणजी मोसमात फारसा प्रभाव न पाडलेल्या मनोज तिवारीकडे शेष भारताची धुरा सोपविण्यात आली असून या सामन्यात सगळी कसर भरुन काढण्याचा त्याचा प्रयत्न असेल. तसेच केदार जाधव, उन्मुक्त चंद, जीवनज्योत सिंग आणि नमन ओझा यांच्यावर देखील शेष भारताची फलंदाजी अवलंबून असेल. विशेष म्हणजे मुंबईचा यशस्वी गोलंदाज शार्दुल ठाकूरकडे शेष भारताच्या गोलंदाजीची धूरा असेल. शार्दुलने यंदाच्या मोसमात शानदार कामगिरी करताना संयुक्तरीत्या सर्वाधिक ४८ बळी घेतले आहेत. विनय कुमारने देखील ४८ बळी घेतले असल्याने दोन्ही संघांची गोलंदाजी तुल्यबळ दिसत आहे. तरी, यंदाचा शेष भारत संघ हा नवखा व युवा खेळाडूंचा असून प्रतिस्पर्धी कर्नाटक पुर्ण जोषात असून त्यांनाच विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. (वृत्तसंस्था)असे असतील संघ : कर्नाटक : विनय कुमार (कर्णधार), मनिष पांड्ये, रॉबीन उथप्पा, आर. समर्थ, करुण नायर, श्रेयश गोपाल, कुणाल कपूर, उदीत पटेल, ए. मिथून, एस. अरविंद, एच सरथ, जे. सुचित, शिशीर भावने, केसी अविनाश, अभिषेक रेड्डी. शेष भारत: मनोज तिवारी (कर्णधार), उन्मुक्त चंद, जीवनज्योत सिंग, पारस डोग्रा, केदार जाधव, नमन ओझा, रिषी धवन, जयंत यादव, प्रग्यान ओझा, शार्दुल ठाकूर, वरुण अ‍ॅरोन, रुष कलारीया, बाबा अपराजीत, जलज सक्सेना, विजय शंकर.