आज रंगणार ’ज्युनियर मुंबई श्री’चा थरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2019 16:46 IST2019-01-04T16:42:03+5:302019-01-04T16:46:27+5:30

मुंबई श्री गटाची ही जिल्हा अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धा लालबाग येथील गणेश गल्लीतील गणेश मैदानात रंगणार आहे.

The 'Junior Mumbai Shree' will be played today | आज रंगणार ’ज्युनियर मुंबई श्री’चा थरार

आज रंगणार ’ज्युनियर मुंबई श्री’चा थरार

मुंबई : दी ग्रेटर बॉम्बे बॉडीबिल्डर्स असोसिएशन तसेच मुंबई उपनगर बॉडीबिल्डिंग व फिटनेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यामाने शुक्रवार ४ जानेवारी २०१९ रोजी सायंकाळी ६ वाजता ‘ज्युनियर मुंबई श्री’ २०१९ शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दिव्यांग/मास्टर्स तसेच ज्युनियर मुंबई श्री गटाची ही जिल्हा अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धा लालबाग येथील गणेश गल्लीतील गणेश मैदानात रंगणार आहे. ज्युनियर मुंबई श्रीच्या किताबासाठी शरीरसौष्ठवपटूंनी कंबर कसली असून जेतेपदासाठी कडवा संघर्ष पाहायला मिळणार आहे. 

५५, ६०, ६५, ७०, ७५ आणि  ७५ किलोवरील अशा सहा गटांत खेळविण्यात येणाऱ्या ज्युनियर मुंबई श्री शरीरसौष्ठव स्पर्धेतील गटविजेत्यांनी अनुक्रमे ३ हजार, २५००, २ हजार, १५०० आणि १ हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येतील. किताब विजेत्याला १ हजार रुपये तसेच आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येईल. दिव्यांग मुंबई श्री आणि नवोदित मुंबई मेन्स फिटनेस फिजित गटातील पहिल्या पाच क्रमांकाच्या विजेत्यांना प्रत्येकी ५ हजार, ४ हजार, ३ हजार, २ हजार आणि १ हजार रुपयांचे इनाम देण्यात येईल. ज्युनियर मुंबई श्री स्पर्धेत २९ जानेवारी १९९८ नंतर जन्मलेल्या शरीरसौष्ठवपटूंना भाग घेता येईल. 

Web Title: The 'Junior Mumbai Shree' will be played today