जितूचा सुवर्णवेध
By Admin | Updated: September 21, 2014 01:47 IST2014-09-21T01:47:20+5:302014-09-21T01:47:20+5:30
फॉर्मात असलेला पिस्तूल नेमबाज जितू रायने 17 व्या आशियाई स्पर्धेत भारताला सुवर्णपदकाचे खाते उघडून दिले,

जितूचा सुवर्णवेध
श्वेताला कांस्य : भारताची चमकदार सुरुवात; पहिल्या दिवशी दोन पदके
इंचियोन : फॉर्मात असलेला पिस्तूल नेमबाज जितू रायने 17 व्या आशियाई स्पर्धेत भारताला सुवर्णपदकाचे खाते उघडून दिले, तर श्वेता चौधरीने कांस्यपदकाचा मान मिळविला. भारताने या स्पर्धेत पहिल्या दिवशी दोन पदके पटकाविण्याची कामगिरी करीत चमकदार सुरुवात केली.
ओंगनियोन शूटिंग रेंजमध्ये जितूने पुरुषांच्या 5क् मीटर पिस्तूल स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली, तर श्वेताने महिलांच्या 1क् मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कांस्यपदक पटकाविले. श्वेताची सहकारी व पदकाची दावेदार हिना सिद्धू व मलाईका गोयल यांची कामगिरी निराशाजनक ठरली. या दोन्ही नेमबाजांना अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले. भारतीय पथकासाठी या स्पर्धेतील सुरुवात समाधानकारक ठरली. ऑलिम्पिकनंतर दुसरी प्रतिष्ठेची स्पर्धा मानल्या जाणा:या आशियाई स्पर्धेत पहिल्या दिवशी भारताने सुवर्णपदक पटकाविले. पहिल्या दिवशी नेमबाजांनी छाप सोडली. अन्य क्रीडा प्रकारांत भारताची कामगिरी संमिश्र ठरली.
नेमबाजांचा ड्रिम स्टार्ट
नेमबाजांनी लौकिकाला साजेशी कामगिरी करताना भारताला आशियाई स्पर्धेत आज पहिल्या दिवशी पदकांचे खाते उघडून दिले. फॉर्मात असलेल्या जितू राय याने 5क् मीटर एअर पिस्तूल नेमबाजीत सुवर्णपदक पटकाविले, तर श्वेता चौधरी हिने 1क् मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कांस्यपदकाचा मान मिळविला.
जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या नेमबाज जितूने चीनचा वांग ङिावेई व दक्षिण कोरियाचा दुहेरी ऑलिम्पिक व गत विश्व चॅम्पियन जोंगोह यांना पिछाडीवर टाकताना सुवर्णपदक पटकाविले. ङिावेई व जोंगोह यांना सुवर्णपदकाच्या फेरीमध्येही स्थान मिळविता आले नाही. विश्व चॅम्पियनशिपमध्ये अलीकडेच रौप्यपदकाचा मान मिळविणा:या जितूने सुवर्णपदकाचे ‘ग्रॅण्ड डबल’ पूर्ण केले. जितूने ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याची कामगिरी केली होती.
जितू आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविणा:या जसपाल राणानंतर दुसरा भारतीय पिस्तूल नेमबाज ठरला आहे. आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविणारा तो चौथा भारतीय नेमबाज ठरला. जितू व जसपाल यांच्या व्यतिरिक्त शॉटगन स्पेशालिस्ट रणधीर सिंग यांनी 1978 मध्ये, तर रंजन सोढीने 2क्1क् मध्ये सुवर्णपदक पटकाविले होते. जितूचे संघसहकारी ओम प्रकाश (555) आणि ओंकार सिंग (551) अनुक्रमे 1क् व्या व 16 व्या स्थानावर राहिले.
दीपिका-ज्योत्स्ना झुंजणार
स्क्व्ॉशमध्ये दीपिका पल्लीकल व ज्योत्स्ना चिनप्पा या भारतीय स्टार खेळाडू एकेरीमध्ये उपांत्यपूर्व फेरीत झुंजणार आहेत. दीपिका व ज्योत्स्ना यांनी शनिवारी एकेरीमध्ये आपापल्या प्रतिस्पध्र्यावर मात करीत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले.
दीपिका व ज्योत्स्ना यांनी ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेत महिलांच्या दुहेरीमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. उपांत्य फेरी गाठणा:या खेळाडूचे पदक निश्चित होईल. चिनप्पाने 183 व्या स्थानावरील दक्षिण कोरियाच्या सोंग सुनमीचा 11-9, 11-7, 11-7 ने पराभव केला, तर दीपिकाने चीनच्या जिनयुईचा 11-6, 1क्-12, 11-6, 11-4 ने पराभव केला.
पुरुष एकेरीत सौरभ घोषालने जॉर्डनच्या अहमद खलील अलसराजचा 11-2, 11-4, 11-3 ने पराभव करीत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. (वृत्तसंस्था)
पहिले पदक श्वेताकडून
श्वेताने नियमित पिस्तूलविना आव्हानाला सामोरे जाताना महिलांच्या 1क् मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कांस्यपदकाचा मान मिळविला. 17 व्या आशियाई स्पर्धेतील भारताचे हे पहिले पदक ठरले. श्वेताने शूट ऑफमध्ये चीनच्या प्रतिस्पध्र्यावर मात केली. श्वेताने एकूण 176.4 चा स्कोअर नोंदविला. चीनच्या झांग मेंगयुआनने 2क्2.2 गुणांसह सुवर्णपदक पटकाविले, तर यजमान दक्षिण कोरियाच्या जुंग जी हेईने 2क्1.3 गुणांसह रौप्यपदकाचा मान मिळविला. श्वेताच्या सहकारी हिना सिद्धू (378) व 16 वर्षीय मलाईका गोयल (373) यांची कामगिरी निराशाजनक ठरली. त्यांना अनुक्रमे 13 व 24 व्या स्थानावर समाधान मानावे लागले. भारतीय संघ 1134 गुणांसह 14 देशांमध्ये पाचव्या स्थानी राहिला.
एशियाडमध्ये आज भारत
बॅडमिंटन : भारत विरुद्ध दक्षिण कोरिया (महिला-उपांत्य फेरी) - भारतीय वेळेनुसार दु.2.3क् वाजता.
बास्केटबॉल : भारत विरुद्ध सौदी अरब (पुरुष) - दुपारी 12.45 वाजता.
सायकलिंग ट्रॅक : महिलांच्या की केरिन पहिल्या फेरीची हिट (देबोरा व मोहन महिता) - दु.12 वा.
अश्वारोहण : ड्रसेज वैयक्तिक इंटरमीडियेत 1 : राजेंद्र सुभाश्री, वनिता मल्होत्र, श्रुती व्होरा, नाडिया हरिदास - 9.3क् वाजता.
फुटबॉल : भारत विरुद्ध थायलंड (महिला) - दुपारी 1.3क् वाजता.
हॅण्डबॉल : भारत विरुद्ध दक्षिण कोरिया (पुरुष-पहिली फेरी) - दुपारी 12 वाजता. भारत विरुद्ध थायलंड (महिला-पहिली फेरी) - दु. 2.3क् वाजता.
हॉकी : भारत विरुद्ध श्रीलंका (पुरुष-‘ब’ गट सामना) - दुपारी 1.3क् वाजता.
नौकायन : पुरुष सिंगल स्कल्स हिट 1 : सुवर्ण सिंग (7 वाजता). लाईटवेट पुरुष क्वाड्रपल स्कल्स हिट 1 : राकेश रालिया, विक्रम सिंग, लक्ष्मीनारायण सोनू, शोकेंदर तोमर (7.3क् वा).
नेमबाजी : 1क् मीटर एअर पिस्तूल (पुरुष-पात्रता फेरी) - जितू राय, समरेश जंग, प्रकाश नानजप्पा (5.3क् वाजता). 1क् मीटर एअर पिस्तूल (पुरुष
संघ फायनल्स) : जितू राय, समरेश जंग, प्रकाश नानजप्पा (5.3क् वाजता).
पुरुष पात्रता फेरी दुसरा दिवस : मानशेर सिंग, डारियस किनान चेनाई, मानवजितसिंग संधू (5 वा.).
ट्रॅप पुरुष संघ फायनल्स : मानशेर सिंग, डारियस किनान चेनाई, मानवजितसिंग संधू (5.3क् वाजता).
स्क्व्ॉश : पुरुष एकेरी (उपांत्यपूर्व फेरी) : सौरव घोषाल विरुद्ध इकबाल नासीर (पाकिस्तान) - 11.3क् वा. महिला एकेरी उपांत्यपूर्व फेरी : ज्योत्स्ना चिनप्पा विरुद्ध दीपिका पल्लीकल (11.3क् वा.).
जलतरण : पुरुष 2क्क् मीटर फ्री स्टाईल हिट : सौरभ सांगवेकर. पुरुष 1क्क् मीटर बॅकस्ट्रोक हिट : प्रथापन नायर. पुरुष 2क्क् मीटर बटरफ्लाय हिट : आरोन डिसूजा.
टेनिस : पुरुष संघ : भारत विरुद्ध नेपाळ (7 वा.)
महिलांचे पदक निश्चित; पुरुष संघाचे आव्हान संपुष्टात
स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल व पी. व्ही. सिंधू यांचा समावेश असलेल्या भारतीय महिला बॅडमिंटन संघाने लौकिकाला साजेशी कामगिरी करताना थायलंडचा 3-2 ने पराभव करीत पदक निश्चित केले; मात्र पुरुष संघाला दक्षिण कोरियाविरुद्ध क्-3 ने पराभव स्वीकारावा लागला. थायलंडविरुद्ध सायना व सिंधू यांनी एकेरीच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये संघर्षपूर्ण विजय मिळविला. सिंधू व अश्विनी पोनप्पा जोडीने महिला दुहेरीत विजय मिळवीत भारताचे पदक निश्चित केले. सायनाने रतचानोक इंतानोनचा 21-15, 17-21, 21-18 ने पराभव करीत संघाला आघाडी मिळवून दिली. दुस:या लढतीत सिंधूने पोरनटिप बुरानप्रासरत्सुकवर 21-15, 21-13 ने सहज मात केली. पी. सी. तुलसी हिला एकेरीच्या तिस:या लढतीत ओंगबमारंगफान बुसाननविरुद्ध 12-21, 14-21 ने पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर प्रज्ञा गदरे व एन. सिक्की रेड्डी या जोडीला पोर्नटिप व कुंचासला बोराविचीचाइकुलविरुद्ध 17-21, 21-18, 16-21 ने पराभव स्वीकारावा लागला. 2-2 अशी बरोबरी असताना अश्विनी व सिंधू या जोडीने निर्णायक सामन्यात सॅपसिरी तेरान्तचाई व सासाली थोंगथोंगकाम या जोडीचा 21-16, 21-17 ने पराभव करीत भारताचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले.
कल्पनाला हुलकावणी
ज्यूदो स्पर्धेत थोडम कल्पना देवीचे कांस्यपदक हुकले. कल्पना देवी हिला महिलांच्या 52 किलो वजन गटात रेपाशेजमध्ये कझाखस्तानच्या लानारिया मिंगाजोवाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. ज्यूदोमध्ये अन्य भारतीय खेळाडूंची कामगिरी निराशाजनक ठरली. नवदीप चाना (पुरुष विभाग, 6क् किलो) आणि लिखमबाम सुशीला देवी (48 किलो) यांना गाशा गुंडाळावा लागला.
अश्वारोहण : भारतीय महिला सहाव्या स्थानी
भारतीय महिला अश्वारोहण संघाला ड्रेसेज प्री सेंट जॉजर्मध्ये सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. राजेंद्र शुभश्री, नादिया हरिदास, वनिता मल्होत्र व श्रुती व्होरा यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाला 65.158 चा स्कोअर नोंदविता आला. आठ संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत भारतीय संघ सहाव्या स्थानी राहिला.
महिला टेनिस : भारताची शानदार सलामी
भारतीय महिला टेनिस संघाने 17 व्या आशियाई स्पर्धेच्या पहिल्या फेरीत ओमानचा 3-क् ने पराभव करीत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. प्रार्थना ठोंबरेने एकेरीच्या पहिल्या सामन्यात ओमानच्या सारा अब्दुल्ला माजीद राशीद बलुशीचा 6-क्, 6-1 ने पराभव केला. एकेरीच्या दुस:या सामन्यात अंकित रैनाने फातमा तालिब सुलेमान अल नबानीचा
6-4, 2-6, 6-3 ने पराभव करीत भारताला 2-क् अशी आघाडी मिळवून दिली. तिस:या व अखेरच्या महिला दुहेरीच्या लढतीत भारतीय जोडीला पुढे चाल मिळाली.
पुरुष संघाचा संघर्षपूर्ण विजय
भारतीय पुरुष व्हॉलिबॉल संघाने संघर्षपूर्ण लढतीत हाँगकाँगचा 3-1 ने पराभव केला, तर महिला संघाला मात्र यजमान दक्षिण कोरियाविरुद्ध क्-3 ने पराभव स्वीकारावा लागला. भारतीय पुरुष संघाने ‘क’गटात खेळताना पहिला सेट गमावल्यानंतर 23-25, 25-18, 25-16, 25-21 ने विजय मिळविला. महिला संघाला ‘अ’ गटात दक्षिण कोरियाविरुद्ध 5-25, 12-25, 13-25 ने पराभव स्वीकारावा लागला.
माङयावर दडपण होते. कुठल्याही परिस्थितीत सुवर्णपदक पटकवायचे, असा निर्धार केला होता. राष्ट्रकुल व विश्व चॅम्पियनशिपपेक्षा ही स्पर्धा वेगळी होती. इच्छा पूर्ण झाल्यामुळे आनंद झाला. - जितू राय
देशसुवर्णरौप्यकांस्यएकूण
दक्षिण कोरियाक्5क्5क्313
चीनक्5क्1क्511
मंगोलियाक्2क्1क्1क्4
कझाकिस्तानक्2क्क्क्3क्5
जपानक्1क्4क्3क्8
भारतक्1क्क्क्1क्2