शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
4
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
5
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
6
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
7
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
8
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
9
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
10
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
11
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
12
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
13
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
14
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
15
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
16
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
17
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
18
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
19
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
20
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

भारत-पाकिस्तान मालिका लंकेत!

By admin | Updated: November 27, 2015 03:32 IST

गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण क्रिकेटजगताचे लक्ष वेधलेल्या प्रस्तावित भारत-पाकिस्तान द्विपक्षीय मालिकेवर अखेर शिक्कामोर्तब करीत दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डाने आपली सहमती दर्शवली

नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण क्रिकेटजगताचे लक्ष वेधलेल्या प्रस्तावित भारत-पाकिस्तान द्विपक्षीय मालिकेवर अखेर शिक्कामोर्तब करीत दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डाने आपली सहमती दर्शवली. ही मालिका श्रीलंकेत खेळवली जाईल, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) वरिष्ठ अधिकारी राजीव शुक्ला यांनी स्पष्ट केले. पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी मुंबईत सात वर्षांपूर्वी केलेल्या हल्ल्याच्या दिवशी म्हणजेच २६/११लाच हा निर्णय झाला, हे विशेष म्हणावे लागेल. लक्षणीय म्हणजे या मालिकेच्या आयोजनाविषयी अंतिम निर्णय होण्यापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनीदेखील श्रीलंकेत या मालिकेच्या आयोजनासाठी हिरवा झेंडा दाखवला होता. संसद परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना शुक्ला यांनी सांगितले की, ‘भारत-पाक क्रिकेट मालिका अंदाजे १५ डिसेंबरपासून खेळविण्यात येईल. ही मालिका पाच सामन्यांची असेल. या निर्णयावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली असून, यामुळे संबंध मजबूत होतील. या मालिकेच्या माध्यमातूनच पुन्हा या दोन्ही देशांतील क्रिकेट संबंधाची सुरुवात होईल.’ २००७ सालानंतर या दोन्ही देशांमध्ये कोणतीही मालिका झालेली नसून २००८ साली मुंबईवर झालेल्या आतंकवादी हल्ल्यानंतर भारत - पाक यांच्यातील क्रिकेट संबंध थांबले होते.नियोजित कार्यक्रमानुसार भारत - पाकिस्तान मालिकेमध्ये २ ‘कसोटी’, ५ ‘एकदिवसीय’ आणि २ ‘टी-२०’ सामने खेळविण्यात येणार होते. मात्र वेळेअभावी केवळ मर्यादित षटकांचेच सामने खेळविले जाण्याची शक्यता आहे.आम्हाला भारतात खेळण्यासाठी कोणतीही अडचण नाही. हे पूर्णपणे संघावर अवलंबून आहे की ते दबावाला कसे सामोरे जातात. आम्हाला भारतात खूप प्रेम मिळाले असून, त्यांना आम्हाला खेळताना पाहायचे आहे.- शाहिद आफ्रिदी, पाक क्रिकेटपटूमालिका खेळवली जात आहे हे महत्त्वाचे आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे भारत - पाक मालिका पुन्हा सुरू होत आहे. दोन्ही देशांनी एकमेकांविरुद्ध खेळणे हे क्रिकेटच्या हिताचे आहे.- वसिम अक्रम, माजी क्रिकेटपटू, पाक