शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

भारताची सरावात सलामी

By admin | Updated: January 9, 2016 03:28 IST

शिखर धवन (७४) आणि विराट कोहली (७४) यांच्या तुफानी खेळीच्या बळावर भारताने आॅस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात चांगली केली. टी-२० सराव सामन्यात पश्चिम आॅस्ट्रेलियाला ७४ धावांनी पराभूत केले.

पर्थ : शिखर धवन (७४) आणि विराट कोहली (७४) यांच्या तुफानी खेळीच्या बळावर भारताने आॅस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात चांगली केली. टी-२० सराव सामन्यात पश्चिम आॅस्ट्रेलियाला ७४ धावांनी पराभूत केले. भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चार गडी बाद १९२ धावा, अशी विशाल धावसंख्या उभारली होती. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या पश्चिम आॅस्ट्रेलियाच्या संघाने ६ बाद ११८ धावा केल्या. भारताला या दौऱ्यात ५ एकदिवसीय व ३ टी -२० सामने खेळायचे आहेत. पहिला एकदिवसीय सामना १२ जानेवारी रोजी पर्थ येथे होईल. भारतीय संघ पश्चिम आॅस्ट्रेलिया एकादश संघाविरुद्ध शनिवारी एकदिवसीय सराव सामना खेळेल. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचा स्टार फलंदाज शिखर धवन आणि विराट कोहली यांनी चांगलाच सराव केला. सलामीवीर रोहित शर्मा ६ धावांवरच बाद झाला. मात्र, त्यानंतर आलेल्या विराटने शिखर धवनसोबत १४९ धावांची भागीदारी केली. दोघांनी १०.९१ प्रतिषटक या वेगाने धावा कुटल्या. शिखरने आॅस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्याच सराव सामन्यात फॉर्ममध्ये परतल्याचे संकेत दिले. त्याने ४६ चेंडूंत ८ चौकार आणि ३ षटकार ठोकले. तर, कर्णधार विराट कोहलीने ४४ चेंडूंत ७ चौकार आणि ३ षटकार ठोकले. शिखरला मॅथ्यू केली याने बाद केले, तर विराटला जोश निकोलसने तंबूत परतवले. मात्र, तोपर्यंत या दोघांनी पश्चिम आॅस्ट्रेलियाच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतलेला होता. विराट संघाच्या १६१ धावा झाल्यावर बाद झाला, तर शिखर धवन १७३ धावांवर परतला. अजिंक्य रहाणे याने २ धावा केल्या. त्याला रेयान डफिल्ड याने बाद केले. कर्णधार महेंद्रसिंह धोनीने १४ चेंडूंत नाबाद २२ धावा केल्या. त्याने एक चौकार आणि २ षटकार ठोकले. या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना पश्चिम आॅस्ट्रेलियाचा संघ भारताच्या वेगवान आणि फिरकी गोलंदाजीचा सामना करू शकला नाही. २० षटकांत ६ गड्यांच्या मोबदल्यात ११८ धावाच तो करू शकला. सलामीवीर ट्रेविस बर्ट याने एकाकी लढत दिली. त्याने ६० चेंडूंत ११ चौकारांच्या मदतीने ७४ धावा केल्या. त्यासोबतच जोश इंगलिस याने २० चेंडूंत ११ धावा केल्या. त्याच्याशिवाय अन्य कोणताही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही.