शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

भारताला पराभवाचा धक्का

By admin | Updated: April 7, 2015 04:06 IST

अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेत सोमवारी न्यूझीलंडने भारताला २-१ असे पराभूत केले. न्यूझीलंडचा कर्णधार सिमॉन चाइल्ड व अ‍ॅँडी हेवर्ड यांनी गोल केले.

इपोह : अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेत सोमवारी न्यूझीलंडने भारताला २-१ असे पराभूत केले. न्यूझीलंडचा कर्णधार सिमॉन चाइल्ड व अ‍ॅँडी हेवर्ड यांनी गोल केले. भारताकडून आकाशदीप सिंगने एकमेव गोल केला. बचावफळीतील खेळाडूंच्या खराब कामगिरीमुळे भारताला पराभवाचा सामना करावा लागला. रविवारी भारत - कोरिया सामना बरोबरीत सुटला होता, तर न्यूझीलंडचा हा सलग दुसरा विजय आहे.भारतासाठी महत्त्वाच्या असलेल्या या सामन्यात आघाडीचा खेळाडू मनदीपसिंग आज मैदानात उतरला नाही. रविवारी कोरियाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याच्या घोट्याला दुखापत झाली होती. सकाळच्या सत्रात येथे मोठा पाऊस झाला. पावसाच्या वातावरणातच सामन्याला सुरुवात झाली. भारताने सुरुवातीला आक्रमक खेळावर भर दिला. दरम्यान, पावसामुळे दहा मिनिटे खेळ थांबवावा लागला. सामन्याच्या दहाव्या मिनिटालाच भारताच्या गुरुबाजने गोल करण्याची चांगली संधी दवडली. त्याने मारलेला चेंडू गोलपोस्टच्या बाहेर गेला. पूर्वार्धात सुरुवातीला दोन्ही संघांनी तुल्यबळ खेळ केला. न्यूझीलंडचा कर्णधार सायमन चाईल्ड याने आघाडीला राहून आक्रमणाची जबाबदारी सांभाळली. त्याने रचलेल्या चालीमुळे भारताच्या बचावफळीला मोठी कसरत करावी लागली. सामन्याच्या १७ व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. मात्र न्यूझीलंडवर आघाडी घेण्याची सुवर्णसंधी भारतीयांनी दवडली. न्यूझीलंडने भारताचा कित्ता गिरवत २६ व्या मिनिटाला मिळालेला पेनल्टी कॉर्नर वाया घालवला. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघाला गोल करता आला नाही. यानंतर न्यूझीलंडने आक्रमक खेळ करत भारतावर दबाव आणला. उत्तरार्धाच्या सुरुवातीलाच निकिन थिमय्याने दिलेल्या पासवर आकाशदीपला गोल करण्यात अपयश आले. यानंतर भारताला तिसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला. मात्र यावरही गोल करण्यात अपयश आले. सामन्याच्या ३८ व्या मिनिटाला सायमन चाईल्डने गोल करत न्यूझीलंडला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर लगेचच ४३ व्या मिनिटाला भारताच्या आकाशदीप सिंगने रघुनाथने दिलेल्या पासवर गोल करत सामन्यात १-१ अशी बरोबरी केली.