कबड्डीत भारताचा सुवर्णोत्सव
By Admin | Updated: October 4, 2014 02:57 IST2014-10-04T02:57:54+5:302014-10-04T02:57:54+5:30
भारतात विजयादशमीचा उत्सव साजरा होत असतानाच भारताच्या पुरुष व महिला अशा दोन्ही कबड्डी संघांनी आशियाई स्पर्धेत सुवर्णोत्सव साजरा केला.

कबड्डीत भारताचा सुवर्णोत्सव
>
भारतात विजयादशमीचा उत्सव साजरा होत असतानाच भारताच्या पुरुष व महिला अशा दोन्ही कबड्डी संघांनी आशियाई स्पर्धेत सुवर्णोत्सव साजरा केला.
पुरुषांचा आक्रमक खेळ राकेशकुमार, जस्बीर, मंजीत चिल्लर आणि अनुप यांनी शेवटच्या सहा मिनिटांत केलेल्या आक्रमक आणि अफलातून खेळामुळे भारतीय पुरुष कबड्डी संघाने इराणचा 27-25 असा अवघ्या दोन गुणांनी पराभव करीत आशियाई स्पर्धेत सलग सातव्यांदा सुवर्णपदक जिंकले.
देवाच्या कृपेने आम्ही जिंकलो. आम्ही विचार केला, त्यापेक्षा ही लढत आव्हानात्मक झाली. आमच्या काही चुकांमुळे त्यांना फायदा झाला, परंतु आम्ही कमबॅक केला.
- राकेश कुमार, कर्णधार
महिलांची तेजस्वी कामगिरी.. भारतीय महिला संघाने सुद्धा इराणचा 31-21 गुणांनी पराभव करून सुवर्णपदक आपल्याकडेच ठेवण्यात यश मिळविले. भारताची संघनायिका तेजस्विनी हिने 14 चढायांत 6 गुण मिळविले, तर 2 वेळा तिची पकड झाली. 2 पकडी तिने यशस्वी केल्या. ममताने 1क् चढायांत 5 गुण मिळविले, तर 1 वेळा तिची पकड झाली. अभिलाषाने 8 चढायांत 5 गुण मिळविले. 1 वेळा तिची पकड झाली. किशोरी शिंदे हिने 4 यशस्वी पकडी केल्या. या स्पर्धेत मध्यरक्षक म्हणून तिने अतिशय उत्तम कामगिरी केली. - सविस्तर वृत्त/क्रीडा
अंतिम फेरीत इराणशी मुकाबला होईल, हे आम्हाला आधीपासूनच माहीत होते. इराणचा खेळ आक्रमक आहे आणि त्यामुळे सुरुवातीपासून मोठी आघाडी घेण्याचा आमचा निर्धार होता. आमची ही रणनीती यशस्वी ठरली.
- तेजस्विनी बाई, कर्णधार, महिला संघ