शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

World Record! काय भारी धावली राव; भारताच्या लेकीनं रचला इतिहास, जिंकलं सुवर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2024 12:41 IST

Para Athletics Championships : दीप्ती जीवनजीने जागतिक स्तरावर कमाल करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली.

Deepthi Jeevanji World Record : भारताच्या दीप्ती जीवनजीने जागतिक स्तरावर कमाल करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. तिने जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२४ मध्ये सुवर्ण जिंकण्यात यश मिळवले. दीप्ती जीवनजीने टी-२० मध्ये ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत विश्वविक्रम नोंदवला. ४०० मीटरचे अंतर अवघ्या ५५.०७ सेकंदात गाठले. यासह भारताच्या दीप्तीने अमेरिकन ॲथलीट ब्रेना क्लार्कचा विक्रम मोडला. यापूर्वी अमेरिकेच्या ब्रेना क्लार्कने पॅरिसमध्ये झालेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ५५.१२ सेकंदांत ४०० मीटर अंतर गाठले होते. 

पण, भारताच्या दीप्तीने हा विश्वविक्रम मोडीत काढला आहे. तुर्कीच्या आयसेल ओंडरने ५५.१९ सेकंदात शर्यत पूर्ण केल्याने तिला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. तर इक्वेडोरच्या लिझानशेला अँगुलोने ५६.६८ सेकंदात अंतर गाठून तिसरे स्थान पटकावले. दरम्यान, या आधी दीप्ती जीवनजीने रविवारी झालेल्या फेरीत ५६.१८ सेकंदाची वेळ घेत अंतर गाठले आणि फायनलचे तिकीट पक्के केले. तिने ५६.१८ सेकंदात अंतर गाठून आशियाई स्तरावर विक्रम केला होता. पण आता दीप्तीने विश्वविक्रम करत सुवर्ण पदक भारताच्या झोळीत टाकले. दीप्तीने वयाच्या २० व्या वर्षी पहिले जगज्जेतेपद पटकावले होते. तिने २०२२ मध्ये प्रथम यासाठी धावण्यास सुरुवात केली.

खरे तर जागतिक पॅरा अथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२४ मध्ये भारताच्या खात्यात आतापर्यंत एकूण चार पदके आली आहेत. दीप्तीने भारताला पहिले सुवर्ण पदक जिंकून दिले. यापूर्वी एक रौप्य आणि दोन कांस्य पदके भारताला मिळाली आहेत. त्यामुळे भारताच्या खात्यात अजून किती पदके येतात हे पाहण्याजोगे असणार आहे. जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२४ ला १७ मे पासून सुरुवात झाली असून, ही चॅम्पियनशिप येत्या शनिवारी संपेल.

टॅग्स :Gold medalसुवर्ण पदकIndiaभारत