शहरं
Join us  
Trending Stories
1
वैद्यकीय हयगय, डॉक्टरांचा हलगर्जीपणा; कुठेही नमूद नाही, पोलिसांना काहीच बोध होत नाही
2
डीजेच्या आवाजाची तक्रार केली, बीडमध्ये महिला वकिलाला सरपंचाकडून बेदम मारहाण
3
"पैसे, दारुच्या बदल्यात मतदान करणारे पुढच्या जन्मात उंट, मेंढ्या, मांजर बनतील; जे लोकशाही..."
4
बाळासाहेबांची सगळी स्वप्ने पंतप्रधान मोदींनी पूर्ण केली; नीलम गोऱ्हे यांची सावध प्रतिक्रिया
5
चौदा गावांचा भुर्दंड कदापि सहन करणार नाही, शिंदेंच्या निर्णयाला गणेश नाईकांचा विरोध कायम
6
IPL 2025: आईसारखी माया..!! गालावर हात फिरवून नीता अंबानींनी काढली इशान किशनची समजूत
7
मंत्री नितेश राणे यांच्या ताफ्याला दाखवले चक्क कोंबड्यांचे फोटो; सोलापूर दौऱ्यावेळी गोंधळ
8
सिद्धार्थ जाधव माझा मुलगाच! महेश मांजरेकर म्हणाले- "मी त्याच्यासाठी काहीच केलं नाही, पण त्याने..."
9
'दामिनी' मालिकेतील अभिनेत्री आठवतेय का? म्हणते - "दामिनीचा प्रभाव आजही तसाच आहे..."
10
वक्फबाबत सुप्रीम कोर्टाचे अंतरिम आदेश; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
'विशाल गवळीच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करा', आई इंदिरा गवळीची याचिका दाखल करणार
12
MI Playoff Scenario: ७ सामने, ३ विजय आणि ६ गुण, प्लेऑफमध्ये जाण्यासाठी मुंबईला किती लढती जिंकाव्या लागतील? असं आहे गणित
13
‘लिव्हिंग विल’ पुनर्प्राप्तीसाठी चार महिन्यांत यंत्रणा तयार करा, उच्च  न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश
14
ठरलं! 'या' दिवशी रिलीज होणार आमिर खानचा 'सितारे जमीन पर', ट्रेलर कधी येणार?
15
Cidco Lottery 2025: अक्षय तृतीयेला सिडको आणणार १२ हजार घरे?
16
मुंबईचा फलंदाज बाद झाला, माघारी परतत असतानाच तिसऱ्या पंचांना दिसली यष्टीरक्षकाची घोडचूक, मग...
17
ठाणे: पट्टे, रॉड अन् बांबूने लहानग्यांना मारहाण, बालआश्रमातील वास्तव; ४ मुलींवर झाले अत्याचार
18
'टी. एन. शेषन यांनी मागितले होते गृहमंत्रिपद', माजी राज्यपालांच्या पुस्तकात खळबळजनक दावा
19
ठाण्यातील १,३०० झाडांवर कुऱ्हाड चालविण्याचा विकासकाचा ‘डाव’, वृक्षांचे वय लपवल्याचे वनविभागाच्या पाहणीत उघड
20
"इंडस्ट्रीतील प्रत्येक महिलेसोबत त्याचे शरीरसंबंध...", अमृता रावची बहीण प्रीतिकाचे टीव्ही अभिनेत्यावर गंभीर आरोप

Sanjita Chanu : चॅम्पियन खेळाडूच्या 'नाडा' आवळल्या! सुवर्ण पदक विजेत्या संजीता चानूवर ४ वर्षांची बंदी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 13:23 IST

National Anti-Doping Agency : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दोनवेळा चॅम्पियन राहिलेल्या भारतीय वेटलिफ्टिंग संजीता चानूवर ४ वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.

Sanjita Chanu । नवी दिल्ली : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (CWG) दोनवेळा चॅम्पियन राहिलेल्या भारतीयवेटलिफ्टिंग संजीता चानूवर ४ वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. मागील वर्षी डोपिंग टेस्टमध्ये फेल झाल्यामुळे  भारताच्या राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेने (नाडा) चार वर्षांची बंदी घातली आहे. खरं तर संजीता मागील वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये गुजरात येथे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या सरावादरम्यान नाबॉलिक स्टेरॉयड-ड्रोस्टॅनोलोन मेटाबोलाइटमुळे संक्रमित आढळली होती, जे जागतिक उत्तेजक द्रव्यविरोधी एजन्सीच्या (वाडा) प्रतिबंधित यादीमध्ये आहे.

भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाचे (IWF) अध्यक्ष सहदेव यादव यांनी संजीतावर बंदी घालण्यात आली असल्याची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले की, "होय, संजीतावर नाडाने चार वर्षांसाठी बंदी घातली आहे." खरं तर हा संजीतासाठी मोठा झटका मानला जात आहे. तिने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये कांस्य पदक जिंकले होते, जे काढून घेण्यात आले आहे. संजीताने २०१४ मध्ये ग्लास्गो राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये ४८ किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले होते. याशिवाय २०१८ मध्ये तिने ५३ किलोचा भार उचलून पदक जिंकले होते.

संजीता चानूवर ४ वर्षांची बंदी

दरम्यान, मणिपूरची खेळाडू संजीता चानूकडे बंदीच्या निर्णयाविरोधात अपील करण्याचा पर्याय आहे. पण ती आवाज उठवणार का हे अद्याप स्पष्ट नाही. संजीताने जानेवारीमध्ये पीटीआयशी बोलताना म्हटले होते, "या आधी देखील मला याचा अनुभव आहे. मला माहिती नाही की मी अपील करेन की नाही कारण दोन्ही प्रकरणांमध्ये माझीच हार होईल." लक्षणीय बाब म्हणजे या आधी देखील २०११च्या आशियाई चॅम्पियनशिपमधील कांस्य पदक विजेत्या खेळाडूला डोपिंग संबंधित वादाचा सामना करावा लागला होता. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Weightliftingवेटलिफ्टिंगCommonwealth Games 2018राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८IndiaभारतGold medalसुवर्ण पदक