Women’s Kabaddi World Cup 2025: कबड्डीतही भारताच्या लेकी जगात भारी! सलग दुसऱ्यांदा जिंकली वर्ल्ड कप स्पर्धा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 18:58 IST2025-11-24T18:56:03+5:302025-11-24T18:58:17+5:30
क्रिकेटच्या मैदानातील ऐतिहासिक कामगिरीनंतर आता कबड्डीतही भारताच्या लेकी जगात भारी ठरल्या आहेत.

Women’s Kabaddi World Cup 2025: कबड्डीतही भारताच्या लेकी जगात भारी! सलग दुसऱ्यांदा जिंकली वर्ल्ड कप स्पर्धा
Indian Women's Team Defeated Chinese Taipei In Women’s Kabaddi World Cup 2025 Final : महिला कबड्डी विश्व चषक स्पर्धेत भारताच्या लेकींनी इतिहास रचला आहे. १३ वर्षांनी आयोजित करण्यात आलेल्या महिला कबड्डी स्पर्धेतील दुसऱ्या हंगामात भारतीय महिला कबड्डी संघाने फायनल लढतीत चायनीज तैपेई (Chinese Taipei) संघाला ३५-२८ अशा फरकाने पराभूत केले. पहिल्या हंगामातील आपला दबदबा कायम राखत भारतीय महिला संघाने जेतेपदाचा यशस्वी बचाव करून दाखवला आहे. क्रिकेटच्या मैदानातील ऐतिहासिक कामगिरीनंतर आता कबड्डीतही भारताच्या लेकी जगात भारी ठरल्या आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
यंदाच्या हंगामात अपराजित राहून सलग दुसऱ्यांदा जिंकली कब्बडी वर्ल्ड कप स्पर्धा
🚨 THIS IS PRETTY HUGE NEWS FOLKS 💥
— The Khel India (@TheKhelIndia) November 24, 2025
WORLD CUP WINNING MOMENTS FOR INDIA 🏆
Indian Women's Team defeated Chinese Taipei 35-28 in the Finals of Kabaddi World Cup 2025!
Our Girls successfully defends the Trophy 🇮🇳💙 pic.twitter.com/rEp45Qu6aW
बांगलादेश येथील ढाका येथे पार पडलेल्या महिला कब्बडी विश्वचषक स्पर्धेतील साखळी फेरीत भारतीय संघाने साखळी फेरीतील सर्वच्या सर्व चार लढती जिंकल्या होत्या. त्यानंतर भारतीय संघाने सेमीफायनलमध्ये तगड्या इराणच्या संघाला पराभूत करून फायनलचं तिकीट मिळवले होते. दुसरीकडे चायनीज तैपेई संघाने यजमान बांगलादेश संघाला पराभूत करत फायनल गाठली होती.
कबड्डी जगतात भारताच्या लेकींचा दबदबा
Dominance Reloaded! 💪🇮🇳 Indian Women’s Kabaddi Team continues its legacy! 🏆 2/2 World Cups
— Ravindra Poojary (@PerarRavindra) November 24, 2025
🥇 3 Golds + 🥈 1 Silver at Asian Games
🏆 5/5 Asian Championships. WORLD CHAMPIONS 2025!
🙌 India defeat Chinese Taipei 35-28 to lift the trophy! 🔥Proud of our queens! 👑💙 #Kabaddipic.twitter.com/RQB3pxq85C
सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकत भारताच्या लेकींनी कबड्डी जगतात आपला दबदबा पुन्हा सिद्ध केला आहे. कर्णधार रितु नेगी आणि उपकर्णधार पुष्पा राणा यांच्या अनुभवी नेतृत्वात संघाने अप्रतिम खेळ करून दाखवला. चंपा ठाकूर, भावना ठाकूर आणि साक्षी शर्मा या तिघींनीही संपूर्ण स्पर्धेत चढाई आणि बचाव या दोन्ही विभागांत उत्कृष्ट कामगिरी करत संघाची ताकद अधिक भक्कम केली.