शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

...तो भारतीय खेळाडू ढसाढसा रडला होता

By admin | Updated: November 18, 2014 01:06 IST

आयपीएल सहामध्ये झालेल्या फिक्सिंग प्रकरणाचा मुद्गल समितीचा अहवालातून धक्कादायक माहिती उघडकीस येत आहे.

नवी दिल्ली : आयपीएल सहामध्ये झालेल्या फिक्सिंग प्रकरणाचा मुद्गल समितीचा अहवालातून धक्कादायक माहिती उघडकीस येत आहे. एन श्रीनिवासन, गुरूनाथ मयप्पन, सुंदर रमन आणि राज कुंद्रा यांच्यासह १३ जणांचा या प्रकरणाशी संबध असून यात भारताच्या दोन अव्वल खेळाडूंचा समावेश असल्याची बाब समोर येत आहे. एका इंग्रजी दैनिकाामध्ये सोमवारी प्रसिद्ध झालेल्या वृत्तात या अहवालात भारताच्या दोन अव्वल खेळाडूंचा समावेश असल्याचे म्हटले आहे आणि त्यापैकी एक हा भारतीय विश्वचषक विजेत्या संघातील खेळाडू आहे. तसेच फिक्सिंगबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता तो मुद्गल समितीसमोर ढसाढसा रडल्याचे समजते. आपले नाव जाहिर केल्यास कारकिर्द संपुष्टात येईल, असेही तो खेळाडू म्हणाला. यातील एक खेळाडू अष्टपैलू असून मुद्गल समितीच्या चौकशी दरम्यान तो रडत होता आणि वारंवार नाव जाहिर न करण्यासाठी विनवणीही करत होता. दुसरा खेळाडू हा जलदगती गोलंदाज आहे. उर्वरित आयुष्य सन्मानाने जगण्याची आमची इच्छा असून नाव न जाहिर करण्याची विनंती हे दोघेही वारंवार समितीसमोर करत होते. या चौकशी दरम्यान समितीने बुकींसमोर खेळाडूंना नेले आणि यापैकी कोणाला ओळखता का अशी विचारणाही केली. चार तासांच्या चौकशीनंतर या खेळाडूने अधिकाऱ्यांना अनपेक्षित विचारणा केली. तो म्हणाला, चौकशी पुर्ण झाली असेल तर आता माझ्याबरोबर तुम्हाला फोटो काढायचा आहे का? यावर अधिकारी चिडला, परंतु त्याने स्मिथ हास्य दिले. तो खेळाडू हुशार आणि आत्मविश्वासाने भरलेला असल्याची प्रतिक्रीया या आधिकाऱ्याने नंतर दिली. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी सादर केलेल्या १९० पानी अहवालातही खेळाडू आणि मयप्पन यांच्यातील मोबाईलद्वारे झालेल्या चौकशीचा तपशील मांडला आहे.