धक्कादायक! फिलीपिन्समध्ये भारतीय कबड्डी प्रशिक्षकाची गोळ्या घालून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 13:10 IST2023-01-05T13:10:18+5:302023-01-05T13:10:55+5:30

कबड्डी प्रशिक्षक गुरप्रीत सिंग गिंद्रू (43) यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.

Indian Kabaddi Coach Shot Dead In Philippines know details here | धक्कादायक! फिलीपिन्समध्ये भारतीय कबड्डी प्रशिक्षकाची गोळ्या घालून हत्या

धक्कादायक! फिलीपिन्समध्ये भारतीय कबड्डी प्रशिक्षकाची गोळ्या घालून हत्या

नवी दिल्ली : पंजाबच्या मोगा येथील कबड्डी प्रशिक्षक गुरप्रीत सिंग गिंद्रू (43) यांची मंगळवारी फिलिपाइन्सच्या राजधानी शहरात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या हत्येची माहिती मनेला पोलिसांनी दिली आहे. कबड्डी प्रशिक्षक गुरप्रीत सिंग हे चार वर्षांपूर्वी आपल्या उदरनिर्वाहासाठी फिलिपाइन्सला गेले होते. 43 वर्षीय सिंग कामावरून परतल्यानंतर अज्ञात हल्लेखोर त्यांच्या घरात घुसले आणि त्यांच्या डोक्यात गोळी झाडली. मात्र, हल्लेखोरांची अद्याप ओळख पटलेली नाही, तसेच कबड्डी प्रशिक्षक गुरप्रीत यांची हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या का केली याचे कारणही समजू शकलेले नाही, असे मनिला पोलिसांनी स्थानिक माध्यमांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

भारतीय नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्यात वाढ 
विदेशात भारतीय नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. दुसऱ्या एका घटनेत कॅनडातील ओंटारियोमध्ये पंजाबमधील एका व्यक्तीचा मृत्यू झाला. भारतीय वंशाचे नागरिक असलेले मोहित शर्मा (28) हे देखील कारच्या मागील सीटवर मृतावस्थेत आढळून आले. उल्लेखनीय बाब म्हणजे विदेशात भारतीय डायस्पोरा विरुद्ध द्वेषपूर्ण गुन्ह्यांच्या बातम्यांमध्ये वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यूकेमध्ये भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना चाहत्यांमध्ये संघर्षाने संपल्यानंतर लीसेस्टर शहरात निषेध, दंगल आणि तोडफोडीच्या घटना घडल्या होत्या.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: Indian Kabaddi Coach Shot Dead In Philippines know details here