शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

भारतीय हॉकी संघाला मिळालेली संधी साधावी लागेल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2019 6:44 AM

प्रशिक्षक ग्राहम रीड यांचे वक्तव्य

भुवनेश्वर : ‘टोकियो आॅलिम्पिकमध्ये पदकाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्ट्रायकर्सने मिळालेल्या संधीचा लाभ घेत बचाव फळीला चांगली कामगिरी करावी लागेल,’ अशी प्रतिक्रिया भारतीय पुरुष हॉकी संघाचे प्रशिक्षक ग्राहम रीड यांनी व्यक्त केली. आॅस्ट्रेलियाचे रीड १९९२ बार्सिलोना आॅलिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकावणाऱ्या संघाचे खेळाडू होते. त्यांच्या प्रशिक्षकपदासाठी आॅस्ट्रेलिया संघाला २०१६ रिओ आॅलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीच्या पुढे मजल मारता आली नव्हती. रीड भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून आॅलिम्पिक पदक जिंकण्याचे स्वप्न पूर्ण करण्यास प्रयत्नशील आहे.

शनिवारी सामन्यानंतर बोलताना ते म्हणाले, ‘माझे स्वप्न पूर्ण झालेले नाही. तुम्ही नेहमी आॅलिम्पिकमध्ये अव्वल स्थान पटकावण्याचे स्वप्न बघता. खेळाडू म्हणून पदक जिंकता आल्यामुळे मी स्वत:ला नशिबवान समजतो. अशा आठवणी सदैव तुमच्यासोबत असतात.’आॅलिम्पिकमध्ये विक्रमी आठवेळा सुवर्णपदकाचा मान मिळवणाºया भारतीय हॉकी संघाने दोन टप्प्यांच्या एफआयएच पुरुष पात्रता फेरीच्या दुसºया लढतीत शनिवारी रशियाचा ७-१ (दोन सामन्यांत एकूण ११-३) असा दमदार पराभव केला. या शानदार विजयासह भारतीय हॉकी पुरुष संघाने पुढील वर्षी टोकियोमध्ये होणाºया आॅलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.भारतीय प्रशिक्षक म्हणाले, ‘आम्हाला या संघाकडून अशीच कामगिरी अपेक्षित आहे. यामुळे आॅलिम्पिक मोहिमेला मोठी मदत होईल. मी खेळाडूंना सांगितले की, तुमच्याकडे अद्याप (आॅलिम्पिकपूर्वी) नऊ महिन्यांचा कालावधी आहे. आपल्याला आपल्या खेळामध्ये सातत्याने सुधारणा करावी लागले. ही आमची योजना आहे. आमचे लक्ष प्रक्रियेवर असून निकाल आपोआप मिळतील.’ (वृत्तसंस्था)‘बचावफळी मजबूत करण्याची गरज’आगामी कालावधीत खेळाडू आपल्या कामगिरीत सुधारणा करतील असा विश्वास व्यक्त करताना रीड म्हणाले,‘आम्हाला संधीचे गोलमध्ये रुपांतर करण्यामध्ये सुधारणा करावी लागेल. आम्ही अनेक संधी निर्माण करतो, ही चांगली बाब आहे. पण, या संधींचे गोलमध्ये रुपांतर करावे लागेल. संघाची बचावफळीही मजबूत करण्याची गरज आहे. कारण प्रतिस्पर्धी संघाला वर्चस्व गाजवण्याच्या अधिक संधी देत आहोत.’

टॅग्स :HockeyहॉकीTeam Indiaभारतीय क्रिकेट संघ