शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
2
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
3
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
4
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
5
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
6
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
7
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
8
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
9
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
10
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
11
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
12
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
13
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
14
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
15
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
16
शनिवारी, रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक; मध्य रेल्वे सेवा पूर्णत: बंद राहणार, मेल-एक्स्प्रेसना फटका
17
इराणची नाकेबंदी सुरूच, ट्रम्प यांचा 'नवा प्लॅन'; संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हे
18
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
19
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
20
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
Daily Top 2Weekly Top 5

भारताला विजयासाठी २८७ धावांचे लक्ष्य

By admin | Updated: November 16, 2014 17:19 IST

भारताविरुद्धच्या पाचव्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात कर्णधार अँजेलो मॅथ्यूजच्या शतकाने श्रीलंकेला तारले असून लंकेने भारतासमोर विजयासाठी २८७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

ऑनलाइन लोकमत

रांची, दि. १६ - भारताविरुद्धच्या पाचव्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात कर्णधार अँजेलो मॅथ्यूजच्या शतकाने श्रीलंकेला तारले असून लंकेने भारतासमोर विजयासाठी २८७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. मॅथ्यूजच्या नाबाद १३९ धावा आणि लाहिरु तिरिमानेच्या ५२ धावांच्या खेळीमुळे श्रीलंकेने ५० षटकात आठ गडी गमावत २८६ धावांची समाधानकारक धावसंख्या गाठली. 
रांचीतील पाचव्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. मात्र या सामन्यातही श्रीलंकेचे सलामीवीर अपयशी ठरले. निरोशन डिकोवाला आणि तिलकरत्ने दिलशान हे सलामीवीर अवघ्या ४५ धावांमध्येच तंबूत परतले. त्यापाठोपाठ चांदीमल आणि जयवर्धने हे दोघेही स्वस्तात माघारी परतल्यामुळे श्रीलंकेची अवस्था ४ बाद ८५ अशी झाली होती. मात्र त्यानंतर कर्णधार अँजेलो मॅथ्यूज आणि थिरिमाने या जोडीने संयमी खेळी करत लंकेची वाताहत रोखली. या जोडीने १२८ धावांची भागीदारी केली. अखेर ५२ धावांवर असताना थिरिमानेला बाद करण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले. तळाच्या फलंदाजांकडून अपेक्षीत साथ मिळत नसतानाही मॅथ्यूजने जोरदार फटकेबाजी करत शतकही झळकावले व संघालाही सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले. मॅथ्यूजने ११६ चेंडूमध्ये १३९ धावा केल्या. विशेष म्हणजे १३७ सामन्यानंतर मॅथ्यूजने एकदिवसीय सामन्यात आपले पहिले वहिले शतक ठोकले. अजंता मेंडिस, सीकुगे प्रसन्ना हे फलंदाज भोपळा न फोडताच बाद झाले. भारतातर्फे धवल कुलकर्णीने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तर अक्षर पटेल आणि आर. अश्विनने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. स्टुअर्ट बिन्नीला फक्त एकच विकेट घेता आली.  पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारत ४- ० ने आघाडीवर असून पाचवा सामना जिंकून लंकेला क्लीन स्वीप देण्यास भारतीय संघ प्रयत्नशील आहे.