भारत - पाकिस्तान सामन्याला अखेर सुरुवात, भारताचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय

By Admin | Updated: March 19, 2016 20:11 IST2016-03-19T20:09:13+5:302016-03-19T20:11:32+5:30

टी-20 वर्ल्ड कपमधील हाय व्होल्टेज भारत - पाकिस्तान क्रिकेट सामन्याला सुरुवात झाली आहे. भारताने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे

India-Pakistan start on the final, India's toss won the toss and decided to bowl | भारत - पाकिस्तान सामन्याला अखेर सुरुवात, भारताचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय

भारत - पाकिस्तान सामन्याला अखेर सुरुवात, भारताचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय

>ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. १९ - टी-20 वर्ल्ड कपमधील हाय व्होल्टेज भारत - पाकिस्तान क्रिकेट सामन्याला सुरुवात झाली आहे. भारताने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ईडन गार्डन्स मैदानावर हा सामना सुरु आहे. 7.30 वाजता सामना सुरु होणार होता मात्र पावसामुळे सामना सुरु होण्यात उशीर झाला. सामना उशीरा सुरु झाल्याने प्रत्येकी 18 ओव्हर्सचा सामना खेळवला जाणार आहे. 
 
न्यूझीलंडकडून पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर वर्ल्ड कपमधील पहिल्या विजयासाठी भारतीय संघ उत्सुक आहे. पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये हरवण्याचा विक्रम कायम ठेवण्याचा भारत प्रयत्न करेल. तर दुसरीकडे पाकिस्तान आशिया कपमध्ये झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याच्या इराद्याने मैदानात उतरली आहे.
 

Web Title: India-Pakistan start on the final, India's toss won the toss and decided to bowl