शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
3
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
4
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
5
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
6
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
7
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
8
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
9
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
11
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
12
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
13
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
14
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
15
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
16
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
17
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
18
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
19
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
20
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत भारताला तब्बल १४ सुवर्णपदके

By admin | Updated: November 5, 2016 20:47 IST

राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत भारताने आपले वर्चस्व कायम ठेवत शनिवारी तब्बल १४ पदके जिंकली. यात ग्रीको रोमन शैलीत पाच, महिला फ्रीस्टाईलमध्ये सहा आणि पुरुष फ्रीस्टाईलमध्ये तीन सुवर्णपदकांचा समावेश आहे.

ऑनलाइन लोकमत
सिंगापूर, दि. 5 - राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत भारताने आपले वर्चस्व कायम ठेवत शनिवारी तब्बल १४ पदके जिंकली. यात ग्रीको रोमन शैलीत पाच, महिला फ्रीस्टाईलमध्ये सहा आणि पुरुष फ्रीस्टाईलमध्ये तीन सुवर्णपदकांचा समावेश आहे. या स्पर्धेत कोल्हापूरची मल्ल रेश्मा माने हिने सुवर्णपदक आणि बीडच्या सोनाली तोडकरने रौप्यपदक पटकावून महाराष्ट्राचा झेंडा उंचावला. 
 
कोल्हापूरची सुवर्णकन्या रेश्मा अनिल माने हिने ६३ किलो वजनी गटात सिंगापूरच्या चरमायनी हुगीटिव्हना आणि भारताच्या गार्गी यादवला पराभूत करून सुवर्णपदक जिंकले. राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते राम सारंग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या रेश्माने गेल्या आठड्यात गोंडा (उत्तर प्रदेश) येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून राष्ट्रकुलची दावेदारी सिद्ध केली होती. 
 
 
मुळची बीडची असलेली व एनआयएस कोच अश्विनी बोराडे यांच्याकडे सराव करणारी मल्ल सोनाली तोडकर हिने ५८ किलो वजनी गटात ऑस्ट्रेलियन महिला मल्लावर विजय मिळविला; मात्र अंतिम फेरीत तिला भारताच्या मंजूकडून पराभूत होऊन रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
 
महिला गटात अन्य लढतीत रितू (४८ किलो), पिंकी (५३ किलो), ललिता (५५ किलो), मंजू (५८ किलो), पिंकी (६९ किलो) यांनी सुवर्णपदके जिंकली.
 
पुरुषांच्या ग्रीको रोमन प्रकारात पाचही वजनी गटांतील सुवर्ण आणि रौप्यपदकांवर भारताने कब्जा केला. ६६ किलो गटात मनीषने सुवर्णपदक, तर रविंदरने रौप्यपदक पटकाविले. ७५ किलो गटात गुरप्रीतने सुवर्ण आणि दिनेश याने रौप्यपदक जिंकले. ८0 किलो गटात हरप्रीत सिंहने सुवर्ण आणि रविंदर खत्रीने रौप्यपदक मिळविले. ८५ किलो गटात प्रभपालने सुवर्णपदक, तर यशपालने रौप्यपदकावर कब्जा केला आणि १३0 किलो गटात नवीन याने सुवर्ण, तर मनवीने रौप्यपदकाला गवसणी घातली.
 
 
आजपर्यंत राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील कुस्ती स्पर्धांमध्ये चांगले यश मिळाले; पण देशासाठी आॅलिम्पिक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळविणे हेच माझे ध्येय आहे. प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली व कुटुंबीयांच्या पाठबळावर माझे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी लागतील ते कष्ट घेण्याचीही माझी तयारी आहे. 
- महिला कुस्तीपटू रेश्मा माने 
 
रेश्माची ही सुरुवात आहे. लहानपणापासूनच ती माझ्याकडे सराव करीत आहे. तिच्यामध्ये जिद्द आणि चिकाटी आहे. माझ्याकडे जी मुले शिकतात, त्यांनी माझ्यापेक्षाही मोठे व्हावे, हीच माझी पहिल्यापासून इच्छा असते आणि रेश्मा हे करून दाखवीत आहे, याचा मला एक गुरू म्हणून अभिमान आहे. 
- राम सारंग, राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते 
 
सोनालीचे वजन ५३ किलो असतानाही मी तिला ५८ किलो गटात खेळविली. तिच्या परिश्रमावर माझा विश्वास होता. राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक मिळवून तिने माझा विश्वास सार्थ ठरविला. सोनाली ही गुणी मल्ल असून, ती आॅलिम्पिकमध्ये देशाला निश्चित पदक मिळवून देईल यात शंका नाही. 
- अश्विनी बोराडे, एनआयएस कोच.