विश्व तिरंदाजीत भारताला एक रौप्य, दोन कांस्य

By Admin | Updated: May 2, 2016 02:10 IST2016-05-02T02:10:16+5:302016-05-02T02:10:16+5:30

भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी करीत चीनच्या शांघाय शहरात सुरू असलेल्या विश्व तिरंदाजी स्पर्धेत एक रौप्य आणि दोन कांस्य पदकांची कमाई केली.

India has one silver, two bronze in World Archery | विश्व तिरंदाजीत भारताला एक रौप्य, दोन कांस्य

विश्व तिरंदाजीत भारताला एक रौप्य, दोन कांस्य

शांघाय : भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी करीत चीनच्या शांघाय शहरात सुरू असलेल्या विश्व तिरंदाजी स्पर्धेत एक रौप्य आणि दोन कांस्य पदकांची कमाई केली.
रिकर्व्ह प्रकारात जर्मनीवर सनसनाटी विजय नोंदवित अंतिम फेरीत दाखल झालेल्या महिला संघाला चायनीज तायपेईकडून २-६ ने पराभवाचा धक्का बसताच रौप्यावर समाधान मानावे लागले. अनानू दास, जयंत तालुकदार आणि मंगलसिंग चम्पिया या त्रिकूटाने पुरुष रिकव्हर प्रकारात ब्रिटेनचा ६-० ने पराभव करीत कांस्य जिंकले. मिश्र दुहेरीत स्टार दीपिका कुमारी आणि अतानू दास यांनी कोरियाच्या जोडीला मागे टाकून कांस्य जिंकले.(वृत्तसंस्था)

Web Title: India has one silver, two bronze in World Archery