सराव सामन्यात भारताची ब्रिटनवर मात

By Admin | Updated: June 19, 2015 02:18 IST2015-06-19T02:18:40+5:302015-06-19T02:18:40+5:30

भारतीय पुरुष हॉकी संघाने एफआयएच वर्ल्ड हॉकी लीगसाठी भक्कम तयारी करीत ब्रिटनला चौथ्या सराव सामन्यात ३-१ ने पराभूत केले.

India beat England in warm-up match | सराव सामन्यात भारताची ब्रिटनवर मात

सराव सामन्यात भारताची ब्रिटनवर मात

एंटवर्प : भारतीय पुरुष हॉकी संघाने एफआयएच वर्ल्ड हॉकी लीगसाठी भक्कम तयारी करीत ब्रिटनला चौथ्या सराव सामन्यात ३-१ ने पराभूत केले. भारताचा ४ सामन्यांत हा तिसरा विजय ठरला. एफआयएच वर्ल्ड सेमिफायनल्स २० जून ते ५ जुलै या कालावधीत होणार आहे. भारताकडून पाचव्या मिनिटाला मिडफिल्डर गुरबाज सिंगने गोल केला. १२व्या मिनिटाला झालेल्या दुसऱ्या हल्ल्यात देवेंद्र वाल्मीकीने २-० अशी आघाडी केली. २०व्या मिनिटाला आकाशदीप सिंगने तिसरा गोल केला. ब्रिटनने एकमेव गोल २८ व्या मिनिटाला केला. भारताच्या बचाव फळीने निर्णायक खेळ करताना ब्रिटनला एकही पेनल्टी कॉर्नर दिला नाही.

Web Title: India beat England in warm-up match