आइसलँडकडून आॅस्ट्रिया पराभूत, हंगेरी-पोर्तुगाल लढत बरोबरीत

By Admin | Updated: June 23, 2016 00:34 IST2016-06-23T00:34:38+5:302016-06-23T00:34:38+5:30

आइसलँड संघाने आॅस्ट्रियाचा २-१ गोलने पराभव करून फ गटात युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला. दुसरीकडे पोर्तुगालविरुद्ध हंगेरी ही लढत ३-३ गोल बरोबरीत संपली

Iceland defeats Austria, competes in Hungary-Portugal | आइसलँडकडून आॅस्ट्रिया पराभूत, हंगेरी-पोर्तुगाल लढत बरोबरीत

आइसलँडकडून आॅस्ट्रिया पराभूत, हंगेरी-पोर्तुगाल लढत बरोबरीत

ऑनलाइन लोकमत
पॅरिस/लेआॅन, दि. २३ : आइसलँड संघाने आॅस्ट्रियाचा २-१ गोलने पराभव करून फ गटात युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला. दुसरीकडे पोर्तुगालविरुद्ध हंगेरी ही लढत ३-३ गोल बरोबरीत संपली. हंगेरीने आधीच अंतिम सोळामध्ये प्रवेश केला आहे, तर पोर्तुगालने गोलफरकावर अंतिम सोळामधील आपली जागा निश्चित केली.


आइसलँड संघाकडून बोर्डवार्सनने १८व्या, तर ट्रास्टोसनने अतिरिक्त वेळेत चौथ्या मिनिटाला गोल केला. आॅस्ट्रिया संघाकडून शॉप्सने ६०व्या मिनिटाला गोल नोंदविला. चुरशीच्या झालेल्या लढतीत हंगेरीकडून झॉल्टन गेराने १९व्या व झुडसाकने ४७ व ५५व्या मिनिटाला गोल नोंदविला. पोर्तुगालकडून नानीने ४२व्या तर रोनाल्डोने ५० व ६२व्या मिनिटाला गोल नोंदविला.

Web Title: Iceland defeats Austria, competes in Hungary-Portugal