आयसीसीच्या कसोटी संघात अश्विन १२वा खेळाडू तर वनडे मध्ये महंमद शमीची वर्णी

By Admin | Updated: December 2, 2015 19:35 IST2015-12-02T19:35:36+5:302015-12-02T19:35:36+5:30

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलेल्या ‘टीम ऑफ द इयर‘मध्ये कसोटी संघात भारताच्या केवळ रविचंद्रन आश्‍विनला स्थान मिळाले आहे. एकदिवसीय संघामध्येही महंमद शमी हा एकमेव भारतीय खेळाडू आहे

In the ICC Test Team, Ashwin is the 12th player and Mohammed Shami is in ODI | आयसीसीच्या कसोटी संघात अश्विन १२वा खेळाडू तर वनडे मध्ये महंमद शमीची वर्णी

आयसीसीच्या कसोटी संघात अश्विन १२वा खेळाडू तर वनडे मध्ये महंमद शमीची वर्णी

>ऑनलाइन लोकमत, 
दुबई, दि. २ - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलेल्या ‘टीम ऑफ द इयर‘मध्ये कसोटी संघात भारताच्या केवळ रविचंद्रन आश्‍विनला स्थान मिळाले आहे. एकदिवसीय संघामध्येही महंमद शमी हा एकमेव भारतीय खेळाडू आहे, तो विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेनंतर भारतीय संघातून बाहेरच आहे. 
वर्षभरातील कामगिरीच्या आधारे कसोटी आणि एकदिवसीय संघ निवडला जातो. या संघाची आज (बुधवार) घोषणा झाली. कसोटी संघामध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि पाकिस्तानच्या प्रत्येकी तीन खेळाडूंचा समावेश आहे. न्यूझीलंडच्या दोन खेळाडूंना या संघात स्थान मिळाले.
कसोटी संघाचा कर्णधार म्हणून अॅलिस्टर कुकची तर वनडे संघाचा कर्णधार म्हणून ए. बी. डीव्हिलीयर्सची निवड झाली आहे. अनिल कुंबळे, इयान बिशप, मार्क बाऊचर, बेलिंडा क्‍लार्क आणि गुंडाप्पा विश्‍वनाथ यांच्या समितीने या संघाची निवड केली. 
> आयसीसीचा कसोटी संघ : 
डेव्हिड वॉर्नर, ऍलिस्टर कुक (कर्णधार), केन विल्यम्सन, युनूस खान, स्टीव्हन स्मिथ, ज्यो रूट, सर्फराझ अहमद (यष्टिरक्षक), स्टुअर्ट ब्रॉड, ट्रेंट बोल्ट, यासीर शहा, जोश हेझलवूड, आर. आश्‍विन 
> आयसीसीचा एकदिवसीय संघ : 
तिलकरत्ने दिल्शान, हाशिम आमला, कुमार संगाकारा (यष्टिरक्षक), एबी डिव्हिलर्स (कर्णधार), स्टीव्हन स्मिथ, रॉस टेलर, ट्रेंट बोल्ट, महंमद शमी, मिचेल स्टार्क, मुस्तफिझूर रहमान, इम्रान ताहीर, ज्यो रूट.

Web Title: In the ICC Test Team, Ashwin is the 12th player and Mohammed Shami is in ODI