शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
2
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
3
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
4
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
5
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
6
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
7
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
8
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
9
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
10
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
11
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
12
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
13
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
14
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
15
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
16
शनिवारी, रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक; मध्य रेल्वे सेवा पूर्णत: बंद राहणार, मेल-एक्स्प्रेसना फटका
17
इराणची नाकेबंदी सुरूच, ट्रम्प यांचा 'नवा प्लॅन'; संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हे
18
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
19
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
20
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
Daily Top 2Weekly Top 5

हैदराबादचा ‘सूर्योदय’

By admin | Updated: May 28, 2016 03:58 IST

प्रमुख फलंदाज स्वस्तात बाद झाल्याचा आपल्या खेळीवर कोणताही परिणाम होऊ न देता कर्णधार डेव्हीड वॉर्नरने नाबाद तडाखेबंद अर्धशतक झळकावत सनरायझर्स हैदराबादला

नवी दिल्ली : प्रमुख फलंदाज स्वस्तात बाद झाल्याचा आपल्या खेळीवर कोणताही परिणाम होऊ न देता कर्णधार डेव्हीड वॉर्नरने नाबाद तडाखेबंद अर्धशतक झळकावत सनरायझर्स हैदराबादला आयपीएलच्या नवव्या सत्रात अंतिम फेरीत नेले. वॉर्नरच्या शानदार कॅप्टन इनिंग्जच्या जोरावर ‘हैदराबाद’ने गुजरात लायन्सविरुद्ध ४ विकेट्सने बाजी मारली. उद्या, रविवारी हैदराबादला विजेतेपदासाठी बलाढ्य रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर भिडावे लागेल.फिरोजशाह कोटला स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ‘हैदराबाद’ने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारताना गुजरातला निर्धारित २० षटकांत ७ बाद १६२ धावांवर रोखले. यानंतर हैदराबादने वॉर्नरच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर १९.२ षटकात ६ बाद १६३ धावा फटकावल्या. शिखर धवन (०), मोइसेस हेन्रीकेस (११), युवराज सिंग (८), दीपक हुडा (४), बेन कटिंग (८) आणि नमन ओझा (१०) झटपट परतल्यानंतर ‘हैदराबाद’वर दडपण वाढले. १६व्या षटकात ६ बाद ११७ अशी अवस्था असताना एका बाजूने खंबीरपणे उभ्या असलेल्या वॉर्नरने जबरदस्त कॅप्टन इनिंग करत अखेरपर्यंत नाबाद राहून संघाला एकहाती विजयी केले. त्याने ५८ चेंडंूत ११ चौकार व ३ षट्कारांसह नाबाद ९३ धावांचा तडाखा देऊन गुजरातच्या हातातील सामना हिसकावून घेतला. बिपुल शर्मानेही ११ चेंडंूत ३ षट्कारांसह २७ धावा कुटताना वॉर्नरला चांगली साथ दिली. शिवील कौशिक व ड्वेन ब्राव्हो यांनी प्रत्येकी २ बळी घेत ‘हैदराबाद’ला रोखण्याचा अपयशी प्रयत्न केला.तत्पूर्वी, ‘गुजरात’ची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर एकलव्य द्विवेदी (५) व कर्णधार सुरेश रैना (१) लवकर बाद झाल्यानंतर ब्रेंडन मॅक्क्युलम व दिनेश कार्तिक (२६) यांनी संघाला सावरले. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ४४ धावांची भागीदारी केली. बोल्टने कार्तिकला धावबाद करून ही जोडी फोडली. यानंतर मॅक्क्युलम (२९ चेंडंूत ३२), ड्वेन स्मिथ (१) झटपट बाद झाल्याने गुजरातचा डाव घसरला. मात्र, अ‍ॅरोन फिंचने ३२ चेंडंूत ७ चौकार व २ षट्कारांसह ५० धावा फटकावत गुजरातच्या धावसंख्येला आकार दिला. बेन कटिंग (२/२०) व भुवनेश्वर कुमार (२/२७) यांनी टिच्चून मारा केला. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलक :गुजरात लायन्स : २० षटकांत ७ बाद १६२ धावा (अ‍ॅरोन फिंच ५०, ब्रेंडन मॅक्क्युलम ३२, दिनेश कार्तिक २६; बेन कटिंग २/२०, भुवनेश्वर कुमार २/२७) पराभूत वि. सनरायझर्स हैदराबाद : १९.२ षटकांत ६ बाद १६३ धावा (डेव्हीड वॉर्नर नाबाद ९३, बिपुल शर्मा नाबाद २७; शिवील कौशिक २/२२, ड्वेन ब्राव्हो २/३२).