शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

गोलंदाजांच्या किती चिंधड्या उडवणार ?

By admin | Updated: February 28, 2015 01:17 IST

केवळ तीन दिवसांत दुसऱ्यांदा चमत्कार घडला. २४ फेब्रुवारीला विंडीजचा फलंदाज ख्रिस गेल याने २१५ धावा कुटल्या. २७ फेब्रुवारीला द. आफ्रिकेचा

केवळ तीन दिवसांत दुसऱ्यांदा चमत्कार घडला. २४ फेब्रुवारीला विंडीजचा फलंदाज ख्रिस गेल याने २१५ धावा कुटल्या. २७ फेब्रुवारीला द. आफ्रिकेचा कर्णधार ए. बी. डिव्हिलियर्स याने केवळ ६६ चेंडू टोलवत १६२ धावांचा पाऊस पाडला. त्याआधी ६४ चेंडूंत १५० धावा ठोकून विश्वचषकात सर्वांत जलद १५० धावा ठोकणारा तो पहिला फलंदाज बनला. खरेतर हा नियमांतील बदलांचा परिणाम आहे. गेलने द्विशतक झळकविले त्यावेळी ‘लोकमत’ने, ‘नियमांच्या बदलांमुळे बॅट झाली धारदार’ या लेखात जे लिहिले ते सत्यात उतरले आहे. नियमांतील बदलांमुळे वन-डे क्रिकेट हा फलंदाजांचा खेळ होऊन बसला आहे. गोलंदाज तर बिचारा ‘हतबल’ आणि ‘लाचार’ झाला आहे.विश्वचषक सुरू होऊन १५ दिवस झाले. या काळात फलंदाजांनी स्वत:ची इतकी दहशत पसरविली की, गोलंदाजांनी धसका घेतला. सर्वच गोलंदाज नाराज आहेत. मागच्या विश्वचषकात एकूण २४ शतकांची नोंद झाली. सध्याच्या विश्वचषकाचा अर्धा टप्पा संपलेला नाही, तोपर्यंत १४ शतके नोंदली गेली. गेल्या विश्वचषकात १५०वर धावांची केवळ दोनदा नोंद झाली; पण सध्याच्या स्पर्धेत अशा धावा तीनदा नोंदल्या गेल्या आहेत. ख्रिस गेलने विश्वचषकाच्या इतिहासातील पहिले दुहेरी शतकही नोंदवून टाकले. मागील विश्वचषकात ३०० धावांचा पल्ला १७ वेळा गाठला गेला. यंदा आतापर्यंत ३०० च्या वर धावांची नोंद १२ वेळा झाली आहे. फलंदाजांचा हा झंझावात पाहून गोलंदाजांना ‘गोलंदाज वाचवा’ अशी मोहीम राबवावी लागेल!