विराट -अनुष्काच्या नात्याचा आदर राखा - युवराज सिंग

By Admin | Updated: March 30, 2015 16:59 IST2015-03-30T16:56:44+5:302015-03-30T16:59:57+5:30

विराट व अनुष्काचे वैयक्तिक जीवन आणि त्यांच्या नात्याचा चाहत्यांनी आदर करायला हाव, असे ट्विट युवराज सिंगने केले आहे.

Honor Virat-Anush's Relationship - Yuvraj Singh | विराट -अनुष्काच्या नात्याचा आदर राखा - युवराज सिंग

विराट -अनुष्काच्या नात्याचा आदर राखा - युवराज सिंग

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३० - विश्वचषकाच्या सेमीफायनमलध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात अपयशी ठरलेला विराट कोहली आणि त्याची प्रेयसी अनुष्का शर्मावर भारतीय क्रिकेटप्रेमींनी टीकेचा भडिमार केला. अनेकांनी तर अनुष्कावरच भारताच्या अपयशाचे खापर फोडले असतानाच विराटचा माजी संघ सहकारी युवराज सिंग त्यांच्या समर्थनासाठी धावून आला आहे. 
'विजय आणि पराभव दोन्ही परिस्थितीत भारतीय संघासोबत असणा-या सच्च्या चाहत्यांनी विराट व अनुष्काच्या वैयक्तिक जीवनाचा आणि त्यांच्या नात्याचा आदर राखला पाहिजे', असे ट्विट युवराजने केले आहे.  ' ऑस्ट्रेलियाच्या दौ-यात पाच शतके ठोकणा-या विराटचा आदर राखत चाहत्यांनी त्याला पाठिंबा दिला पाहिजे. त्याचे भविष्य उज्वल असून आगामी काळात तो भारतासाठी नक्कीच चांगली कामगिरी करेल', असा विश्वासही युवराजने व्यक्त केला आहे. 
 

Web Title: Honor Virat-Anush's Relationship - Yuvraj Singh