झेल घेताना एकमेकांना धडकल्याने हॅनरिक्स, बर्न्‍स गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2015 21:29 IST2015-06-15T21:29:42+5:302015-06-15T21:29:42+5:30

Hennrix and Burns were seriously injured when they were caught in the catch | झेल घेताना एकमेकांना धडकल्याने हॅनरिक्स, बर्न्‍स गंभीर जखमी

झेल घेताना एकमेकांना धडकल्याने हॅनरिक्स, बर्न्‍स गंभीर जखमी

>लंडन: ऑस्ट्रेलियन क्रिकेटर मोअँसिस हॅनरिक्स आणि त्याचा संघ सहकारी रॉरी बर्न्‍स यांचा इंग्लिश टी-20 काउंटी क्रिकेट सामन्यादरम्यान एक झेल टिपताना दोघेही एकमेकांना धडकल्याने गंभीर जखमी झाले आहेत़ सरे आणि सुसॅक्स संघादरम्यान सुरु असलेल्या काउंटी सामन्यामध्ये या दोन्ही खेळाडूंची झेल घेताना टक्कर झाली़ यानंतर हॅनरिक्सचा तीन ठिकाणी जबडा तुटला तर बर्न्‍सच्या चेहर्‍याला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली़ ही घटना सामन्याच्या 19 व्या षटकात घडली़ यानंतर दोन्ही संघांच्या सहमतीने सामना रद्द करण्यात आला़ एका वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, सरे संघाकडून आलेल्या विधानाच्या माध्यमातून सांगण्यात आले की, दोन्ही खेळाडूंवर तातडीने उपचार करण्यात आल़े आता दोन्ही खेळाडूंची स्थिती ठीक असल्याचे रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितल़े

Web Title: Hennrix and Burns were seriously injured when they were caught in the catch