शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
4
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
5
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
6
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
7
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
8
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
9
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
10
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
11
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
12
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
13
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
14
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
15
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
16
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
17
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
18
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
19
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
20
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

आॅस्ट्रेलिया भारतात घेणार माँंटी पानेसरची मदत

By admin | Updated: January 18, 2017 04:20 IST

क्रिकेट आॅस्ट्रेलियाने पुढील महिन्यात होणाऱ्या भारत दौऱ्यासाठी कंबर कसली आहे.

मेलबोर्न : क्रिकेट आॅस्ट्रेलियाने पुढील महिन्यात होणाऱ्या भारत दौऱ्यासाठी कंबर कसली आहे. त्यांनी आता भारत दौऱ्याची तयारी करण्यासाठी इंग्लंडचा फिरकीपटू माँटी पनेसरची फिरकी गोलंदाज सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. सिडनीमध्ये क्लब क्रिकेटपटू म्हणून खेळत असलेल्या ३४ वर्षीय पानेसरने २०१२-१३ मध्ये इंग्लंडला भारतात संस्मरणीय विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे क्रिकेट आॅस्ट्रेलियाने त्याची निवड केली आहे. पनेसरने त्यावेळी तीन कसोटी सामन्यांत १७ बळी घेतले होते. आॅस्ट्रेलियन मीडियाच्या वृत्तानुसार पनेसर या आठवड्यात सेंटर आॅफ एक्सलन्सचा दौरा करणार असून तो फिरकीपटू स्टीव्ह ओ किफे व्यतिरिक्त सलामीवीर मॅट रेनशॉ यांच्यासोबत काम करणार आहे. पनेसरची नियुक्ती क्रिकेट आॅस्ट्रेलियाचे हाय परफारमन्स व्यवस्थापक पॅट होवार्ड यांच्या मतानुसार करण्यात आली. भारतीय फिरकी जोडी रविचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजा यांच्याकडून मिळणाऱ्या आव्हानाला उत्तर देण्यासाठी ही योजना आखण्यात आली. अश्विन व जडेजा यांनी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत पाच सामन्यांमध्ये एकूण ५४ बळी घेतले होते.होवार्ड म्हणाले, ‘भारतात खेळण्यासाठी संघाच्या तयारीत मोंटीचे जुळणे चांगली बाब आहे. गोलंदाज काय करण्याचा प्रयत्न करणार आहे, याबाबत फलंदाजांनी विचार करावा, असे आम्हाला वाटते. त्यासाठी मोंटीची मदत होईल. या व्यतिरिक्त तो गोलंदाजांनाही मदत करणार आहे. (वृत्तसंस्था)>फिरकी सल्लागारपदी श्रीधरनमेलबोर्न : भारताविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत फिरकीला अनुकूल खेळपट्ट्यांवर खेळण्यास सक्षम बनविण्यासाठी क्रिकेट आॅस्ट्रेलियाने माजी भारतीय फिरकीपटू श्रीराम श्रीधरनची फिरकी सल्लागारपदी नियुक्ती केली आहे. श्रीधरनने भारतातर्फे मार्च २००० ते डिसेंबर २००४ या कालावधीत ८ वन-डे सामने खेळले आहेत. त्यांनी गेल्या वर्षी आॅस्ट्रेलिया संघाची श्रीलंका दौऱ्यात आणि भारतात खेळल्या गेलेल्या विश्व टी-२० स्पर्धेदरम्यान मदत केली होती.